UPI Payment : ऑनलाइन पेमेंट करता वेळेस लक्षात ठेवा या 5 गोष्टी, फसवणूक करणारे जवळ सुद्धा येणार नाही

ऑनलाइन पेमेंटकरता वेळेस काही लोकांच्या मनामध्ये नेहमी एक भीती असते की आपल्या बरोबर फसवणूक तर होणार नाही ना ? खरतर फसवणूक करणारे लोक अशाच युजरच्या शोधामध्ये असतात जे मूर्ख असतात आणि त्यांच्या जाळ्यांमध्ये सहजच फसतात. जर तुम्हाला अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित राहायचे असेल तर खाली दिलेल्या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

upi payment

आजकाल सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारल्या जात आहे आणि सगळी माणसे आता डिजिटल पेमेंट द्वारे पैशाची देवाणघेवाण करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत डिजिटल पेमेंट करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला सोबत पैसे घेऊन फिरावे लागत नाही आणि हे सगळे शक्य होऊ शकले आहे तर फक्त मोबाईल मुळे ज्याला आपण आपला एक जवळचा मित्र सुद्धा म्हणू शकतो.

कारण की तो सतत आपल्या सोबत असतो ऑनलाइन पेमेंट करण्याचे असे बरेच फायदे आहेत पण त्याचबरोबर सतत आपल्या मनामध्ये एक शंका असते की आपल्या बरोबर फसवणूक तर होणार नाही ना कारण की फसवणूक करणाऱ्या लोकांची संख्या आजकाल वाढत चाललेली आहे. खरतर फसवणूक करणारे लोक अशाच युजरच्या शोधामध्ये असतात जे सहजच त्यांच्या जाळ्या मध्ये फसतात मध्ये त्यांचे बँक अकाउंट पूर्णपणे खाली करतात. जर तुम्हाला अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित राहायचे असेल तर खाली दिलेल्या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

1. तुमचे यु पी आय पिन कोणाबरोबर शेअर करू नका

सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचा युपीआय पिन कोणाबरोबर शेअर करू नका. यूपीआय पीन हा तुमच्या एटीएम कार्डच्या पिन सारखाच असतो जशा प्रकारे आपल्याला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम पिन ची गरज असते अगदी त्याच प्रकारे यूपीआय पीन सुद्धा असतो. कोणत्याही ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करता वेळेस आधी युपीआय पिन इंटर करावा लागतो म्हणजे युपीआय पिन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला सुरक्षित ठेवणे ही आपली जिम्मेदारी असते.

2. कोणत्याही नको असलेल्या लिंकवर क्लिक करू नका

फसवणूक करणारे लोक नेहमी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लिंक पाठवत असतात व त्यावर क्लिक करायला सांगतात जर तुम्ही अशा लिंक वर क्लिक केले तर त्यांना तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळतो व तुमची सगळी माहिती ते सहजपणे मिळू शकतात तेही तुमच्या नकळत त्यामुळे नेहमी कोणत्याही प्रकारचे लिंकवर क्लिक करताना त्या अगोदर त्याबद्दल सगळी माहिती मिळून घ्या व नंतर क्लिक करा जर गरज नसेल तर अशा लिंक कडे दुर्लक्ष करा. फसवणूक करणारे नेहमी अनोळखी नंबर ईमेल एड्रेस आणि व्हाट्सअप ग्रुप द्वारे अशा प्रकारचे लिंक पाठवत असतात त्यामुळे नेहमी सतर्क राहा

3. ज्याला पैसे पाठवत आहात त्याचे डिटेल चेक करा

यूपीआय पेमेंट करताना नेहमी तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात त्याची यूपी आयडी आणि त्याच्याबद्दलची जी माहिती दिलेली असेल त्यावर एक वेळेस तुमची नजर फिरवा व ती माहिती तपासून बघा कारण ज्यावेळेस यूपीआय ची सुरुवात झाली होती त्यावेळेस असे बऱ्याचदा पाहण्यात आले होते की यूटीआय ॲप मध्ये रिसिवर ची आयडी ही चुकीची असायची त्यामुळे फसवणूक करणारे लोक या गोष्टीचा फायदा घेऊन तुमच्याकडून पैसे सेंड करून घेत असे पेमेंट रिसिवर ची माहिती ज्या ठिकाणी पैसे इंटर करण्याचा बॉक्स येतो त्याच्या वरच्या बाजूला दिलेली असते ही सगळी माहिती चेक केल्यानंतर पेमेंट करा.

4. तुमच्या मोबाईलची सेक्युरिटी नेहमी अपडेट ठेवा

तुमच्या मोबाईलची सेक्युरिटी नेहमी अपडेट ठेवा आता सगळ्याच स्मार्टफोन कंपन्यांच्या लक्षात आलेले आहेत की हॅकर्स युजरच्या मोबाईल चा एक्सेस घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत असतात एक्सेस मिळाल्यानंतर युजर ची सगळी माहिती चोरी करतात व त्यांची फसवणूक करतात अशा प्रकारचे प्रकरण टाळण्यासाठी मोबाईल फोन कंपन्या नेहमीच मोबाईल सिक्युरिटी मध्ये अपडेट आणत असतात यामुळे जर हॅकस यूजर च्या फोनचा एक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच वेळेस कंपन्या युजरला एक अलर्ट मेसेज देतात व युजरचा फोन सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करतात

5. सगळ्याच पेमेंट एप्लीकेशन वर फिंगरप्रिंट लॉक चालू ठेवा

आता सगळ्याच डिजिटल पेमेंट अप्लिकेशन मध्ये फिंगर प्रिंट लॉक सेंसर चा फिचर आलेला आहे या फिचरचा उपयोग तुम्ही नक्की करायला पाहिजे कारण की जर तुम्ही पेमेंट अप्लिकेशन वर फिंगरप्रिंट सेंसर चालू ठेवले तर तुमच्या शिवाय दुसरा कोणीही त्या ॲप्लिकेशनचा एक्सेस घेऊ शकत नाही.

Leave a Comment