संत नामदेव विषयी माहिती | Sant Namdev Information In Marathi

Sant Namdev Information In Marathi महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अनेक संत होऊन गेलेले आहे व त्यांनी मोठ मोठी कामगिरी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राला संतांची पवित्र भूमी असेही म्हणतात. आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्रामधील एका खूप मोठ्या संताविषयी माहिती घेणार आहोत ते म्हणजे संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठलाचे खूप मोठे निस्सीम भक्त होते त्यांनी अनेक अभंग रचले आहेत आणि आपल्या कीर्तना मधून जनतेला जागृत सुद्धा केलेले आहेत. अशा थोर संताविषयी आपण आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती करून घेणार आहोत तर चला तुमचा वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया या लेखाला.

संत नामदेव यांची माहिती व कार्य (Sant Namdev Information In Marathi)

Sant Namdev Information In Marathi संत नामदेव
संत नामदेव
नावनामदेव दामाशेटी रेळेकर
आईचे नाव गोणाई 
वडिलांचे नावदामाशेटी
पत्नीराजाई
मुले गोविंद, विठ्ठल, नारायण, महादेव आणि लिंबाई
गावजिल्हा हिंगोली गाव नरसी
जन्म 26 ऑक्टोंबर 1270
संजीवन समाधी3 जुलै 1350
Sant Namdev Information chart

संत नामदेव हे भारतामधील प्रसिद्ध संतान पैकीच एक संत होते. संत नामदेव यांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी 26 ऑक्टोंबर 1270 मध्ये झाले संत नामदेवांचे पूर्ण नाव “नामदेव दामाशेटी रेळेकर” असे होते त्यांच्या आईचे नाव गोनाई असे होते त्यांच्या आई-वडिलांचा मुख्य व्यवसाय कपडे शिवणे (शिंपी) हा होता व त्यावरच त्यांचे घर चालत होते संत नामदेवांच्या काळात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती त्यामुळे त्यांचे लग्न वयाच्या 11 व्या वर्षी राजाई यांच्या बरोबर करण्यात आले.

संत नामदेवांच्या परिवारामध्ये एकूण पंधरा माणसे होते त्यांची पत्नी राजाई व त्यांची मोठी बहीण आऊबाई तसेच त्यांना चार मुले आणि एक मुलगी होती त्यांचे नाव नारा, विठा, गोंदा, महादा आणि मुलीचे लिंबाई संत जनाबाई स्वतःला नाम्याची दासी असे म्हणत होते त्याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या

संत नामदेव हे जुन्या काळातील मराठी भाषेतील कविनपैकी एक कवी होते ते भागवत धर्माला शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब चित्रकार, आत्मचित्रकार आणि कीर्तनाद्वारे पंजाब पर्यंत घेऊन जाणारे पहिले प्रचारक होते. त्यामुळेच पंजाबमधील लोक त्यांना खूप जास्त मानतात व त्याचे जन्मस्थान असलेले नरसी नामदेव गावाचा विकास करण्यासाठी धडपडत असतात.

संत नामदेव म्हणजेच भक्तशिरोमणी हे ज्ञानेश्वराच्या कालखंडातील एक संत होते. असे म्हटले जाते की संत नामदेव हे विठ्ठलाचे खूप जवळचे मित्र होते ते वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते व त्यांनी भावनिक एकात्मता साधण्यासाठी भारतभर भ्रमंती केली तसेच नामवेदाचे आणि नामविद्येचे प्रणेते ही होते.

एके दिवशी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत गोरा कुंभार यांच्याकडे मेळा भरला होता त्या मेळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, संत नामदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, संत चोखामेळा आणि विसोबा खेचर ही सगळी संत उपस्थित होती. या प्रसंगानंतर संत नामदेव महाराज यांना त्यांचे आध्यात्मिक गुरू म्हणून ‘षट्स्थल’ हा ग्रंथ लिहिणारे विसोबा खेचर लाभले.

संत नामदेवांनी एकूण 2500 अभंग लिहिलेले आहेत. त्यांनी शिरोमणी भाषेत सुद्धा 125 अभंगाची रचना केलेली आहे नामदेवाची मुख्यबाणी म्हणून त्यातील जवळपास 62 अभंग शिकाचे गुरुग्रंथसाहेब या ग्रंथांमध्ये घेण्यात आलेले आहेत. ही सगळी अभंग गुरुग्रंथसाहेब ग्रंथामध्ये गुरु लिपीमध्ये घेण्यात आलेले आहेत. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचै चरित्र, समाधी व तीर्थावळी या गाथंतील तीन अध्यायांतून सांगितलेले आहे

संत नामदेव त्यांच्यात कीर्तनामध्ये सतत चांगल्या ग्रंथाचा उल्लेख करत असे. यावरून ते खूप जास्त अभ्यासू होते असे आपल्या लक्षात येईल “नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग” अशी त्यांची योग्यता होती “नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” हे त्याच्या आयुष्यातील ध्येय होते 

संत ज्ञानेश्वराच्या संजीवन समाधीनंतर संत नामदेवांनी भागवत धर्माचे एक प्रणेते म्हणून पुढे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. पंजाब मधील शिख लोक “नामदेव बाबा” म्हणून त्यांचे गुणगान गात असतात त्याकरिता त्यांनी पंजाबमधील घुमान येथे संत नामदेवाचे मंदिरही उभारलेले आहेत संत नामदेवाचे पंजाबमध्येही काही शिष्य होते त्यांचे नाव बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव व कलाधारी हे होते. राजस्थानामध्ये सुद्धा शिक लोकांनी संत नामदेवांचे मंदिर उभारलेले आहेत

संत नामदेव अख्यायिका

संत नामदेवाचे परिवारातील सगळी माणसं विठ्ठलाचे भक्त होते त्यामुळे ते विठ्ठलाची रोज पूजा करून त्याला नैवेद्य देत होते एके दिवशी संत नामदेव यांच्या वडिलांनी म्हणजेच दामाशेट्टीने संत नामदेव यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांगितले तेव्हा नामदेव फक्त नैवद्य घेऊन गेले असे नाही तर ते विठ्ठला पुढे नैवद्य ठेवून त्या ठिकाणी बसून वाट पाहू लागले की कधी विठ्ठल येईल आणि हा नैवद्य खाईल. संत नामदेवांच्या निरागस अपेक्षेला मान देऊन साक्षात विठ्ठल प्रकट झाले व त्यांनी नामदेवांनी दिलेला नैवेद्य ग्रहण केला

एके दिवशी त्यांच्या घरातील एक चपाती कुत्रा घेऊन पळाला हे जेव्हा संत नामदेवाच्या लक्षात आले त्यावेळेस त्या कुत्र्याला ती चपाती कोरडी लागू नये म्हणून संत नामदेव कुत्र्याच्या मागे मागे तुपाची वाटी घेऊन पळू लागले. असे होते संत नामदेव

संत नामदेव एका वेळेस महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले होते व त्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी तेथील पुजार्‍यांनी त्यांना मनाई केली त्या पुजाऱ्यांचा मान राखून संत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी नागनाथाची ओळवी करू लागलो. त्यानंतर नामदेवाचे भक्ती बघून देवाने पूर्वमुखी असलेले मंदिर फिरवून त्याला पश्चिम मुखी केले आणि आजवर ते मंदीर तसेच आहेत.

निष्कर्ष

Sant Namdev Information In Marathi या लेखामध्ये आपण संत नामदेव विषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे म्हणजे त्याच्या जन्मापासून तर त्यांनी जिवंत समाधी घेईपर्यंत सगळी माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे दिलेल्या माहितीमध्ये काही चूक आढळल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे अशी आम्हाला खात्री पटल्यास आम्ही नक्की यामध्ये बदल करू दिलेली माहिती आवडल्यास या लेखाला शेअर करा व अशीच नवनवीन लेख वाचण्यासाठी इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट द्या

FAQ

संत नामदेवांचे पूर्ण नाव ?

नामदेव दामाशेटी रेळेकर

संत नामदेवांच्या आईचे नाव ?

गोणाई

संत नामदेवांना किती मुले होते ?

संत नामदेवांना चार मुले आणि एक मुलगी होती

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

1 thought on “संत नामदेव विषयी माहिती | Sant Namdev Information In Marathi”

Leave a Comment