डेबिट कार्ड शिवाय UPI सेवेचा लाभ आता PhonePe वर! पद्धत जाणून घ्या…

PhonePe UPI activation with Aadhaar: तुमच्याकडे डेबिट कार्ड नसले तरीही तुम्ही PhonePe द्वारे UPI पेमेंट करू शकता. चला त्याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया.

PhonePe UPI activate with Aadhaar

PhonePe UPI activation with Aadhaar: डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे ॲप्स उपलब्ध आहेत जे त्यांच्या विविध वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. यापैकी, सर्वात प्रमुख नावे म्हणजे Google Pay, PhonePe आणि Paytm.फोन पे बद्दल सांगायचे असेल तर PhonePe ने नुकताच एक अप्रतिम फीचर जारी केला आहे, त्यामुळे फोन पे च्या वापरकर्त्यांची संख्या आणखी वाढवू शकते. 

PhonePe वरील अपडेटनुसार, वापरकर्ते डेबिट कार्डशिवाय UPI सेवेचा लाभ घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल, तर तुम्ही चिंता न करता UPI पेमेंट करू शकता. तर चला जाणून घेऊया PhonePe वर आलेल्या या अप्रतिम विचार बद्दल ?

Phonepe वर आलय एक नवीन महत्त्वाचा फीचर्स

PhonePe वर आता आधार कार्ड सक्रिय करून  बिना डेबिट कार्डशिवाय (PhonePe UPI Payment with Aadhaar) UPI पेमेंट करता येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की यूपीआय बेस्ट पेमेंट एप्लीकेशन वापरण्यासाठी आपल्याला आधी डेबिट कार्ड ची गरज पडायची. पण, फोन पे वर आलेल्या या नवीन फिचर्समुळे आता फोन पे वापरकर्ता बिना डेबिट कार्ड शिवाय आधार कार्डच्या मदतीने सुद्धा आपला बँक अकाउंट फोन पे सोबत  लिंक करू शकतो.

आधार कार्डचा वापर करून करा UPI सक्रिय

झटपट पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe चे नवीन वैशिष्ट्य जारी करण्यात आले आहे. या अंतर्गत, UPI आता आधार कार्ड OTP प्रमाणीकरणाद्वारे सक्रिय केले जाऊ शकते. हे नवीन फीचर सादर केल्यामुळे, PhonePe हा पहिला अप्लिकेशन झालेला आहे जो की तुम्हाला डेबिट कार्ड शिवाय आधार कार्डच्या मदतीने UPI पेमेंट करण्याची परवानगी देतो.

आधार कार्डद्वारे पेमेंट कसे केले जाईल ?

PhonePe ॲप्लिकेशनच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे अनुसरण करून आधार कार्ड पेमेंट केले जाऊ शकते. यासाठी आधार कार्डचा पर्याय निवडून आधार कार्डचे शेवटचे 6 अंक टाकावे लागतील. याचा अर्थ आता वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी कोणत्याही डेबिट कार्ड तपशीलांची आवश्यकता नाही.

नोंदणी कशी करावी ?

PhonePe एप्लीकेशन उघडा. त्या ठिकाणी आधार कार्डचा पर्याय निवडा. यानंतर आधारचे शेवटचे 6 अंक टाका. आता आधार लिंक नंबरवर UIDAI कडून OTP येईल. OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर, बँकेकडून एक OTP देखील येईल, तो प्रविष्ट करा आणि सत्यापन पूर्ण करा. अशाप्रकारे, आता तुम्ही डेबिट कार्डशिवायही फक्त आधार कार्डद्वारे UPI पेमेंट करू शकाल.

Leave a Comment