Mutual Fund Information in Marathi | म्युच्युअल फंड इतिहास, प्रकार, गुंतवणूक, फायदे 2022

म्युच्युअल फंड, प्रकार, गुंतवणूक, फायदे, नुकसान (Mutual Fund Information in Marathi, Types, investment, Benefit, History)

जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैशाची गुंतवणूक करून त्यावर जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण या मध्ये रिस्क कमी आणि रिटर्न्स जास्त मिळण्याची शक्यता असते. सध्याच्या स्थितीमध्ये शेअर बाजारात पैसेची गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यापैकी म्युच्युअल फंड कडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होताना दिसत आहे. कारण यामध्ये SIP चा पर्याय दिलेला आहे SIP काय आहे या बद्दल आपण खाली चर्चा करणार आहोतच. ज्या लोकांना शेअर बाजारा बद्दल कमी माहिती आहे, त्या लोकांसाठी म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो 

म्युच्युअल फंड बद्दल आपण नेहमी टीव्ही, न्यूज पेपर आपले मित्र किंवा नातेवाईक यांच्या तोंडून ऐकत असतो पण त्या बाबतीत आपल्याकडे माहिती नसल्यामुळे आपण त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाही आजही आपल्या महाराष्ट्र मध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंड बद्दल शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नाही. 

Mutual fund information in Marathi(म्युच्युअल फंड प्रकार, गुंतवणूक, फायदे, नुकसान)

त्यामुळे मी हा लेख लिहिण्याचा विचार केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांनाही म्युच्युअल फंड बद्दल माहिती होईल व तेही शेअर बाजारांमध्ये आपले पैशाची गुंतवणूक करून त्यावर नफा कमवू शकेल. 

या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंड काय आहे म्युच्युअल फंडाचे प्रकार ? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ? म्युच्युअल फंड चे फायदे ? म्युच्युअल फंड चे नुकसान इत्यादी विषयावर माहिती घेणार आहोत तर चला सुरवात करूया आजच्या लेखाला

Table of Contents

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? (Mutual Fund Information in Marathi)

मराठीमध्ये म्युच्युअल फंड ला सामाईक निधी असे म्हणतात. म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे वेगवेगळे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूकदार या म्युच्युअल फंडाचा उपयोग करतो. जसे की पैसे कमवणे, पैशावर लागणाऱ्या कराची बचत करणे आणि नियमित पैसे मिळविणे. यामध्ये एक फंड मॅनेजर निवडलेला असतो जो तुमच्या पैशाची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो व त्यापासून मिळणारा नफा-नुकसान या सगळ्यांचा हिशोब ठेवतो. 

म्युच्युअल फंड कंपनी सगळ्या गुंतवणूक दारांना कडून पैसे जमा करते व त्या पैशाला शेअर बाजारामध्ये गुंतवून त्यापासून मिळणारा नका किंवा नुकसान सगळ्या गुंतवणूकदारांमध्ये वाटप करते पण ही सगळी प्रोसेस करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनी सगळ्या गुंतवणूकदारांवर काही सर्विस चार्ज आकारते. 

जर एकदा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैशाची गुंतवणूक केली. त्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नसते कारण शेअर बाजारातून शेअर खरेदी करणे व योग्य वेळेला ते विकणे ही सगळी कामे फंड मॅनेजरचे असतात.

म्युच्युअल फंड चा इतिहास ? (Mutual fund History in marathi)

अठराव्या शतकात एका डच व्यापाराने छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक संस्था निर्माण केली त्या संस्थेचे नाव एकी बळ निर्माण करते असे होते ही संस्था छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यामध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी तयार करण्यात आली होती. तेव्हापासूनच आज ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो त्याची सुरुवात झाली.

त्यानंतर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांनी एकत्र येऊन 1963 मध्ये “युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया” म्हणजेच भारतीय बिगर बँक वित्तसंस्था ची स्थापना केली हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड मानला जातो 

त्यानंतर वेगवेगळे महामंडळे आणि बँक म्युच्युअल फंड मध्ये प्रवेश करू लागल्या त्यामुळे 1993 मध्ये म्युच्युअल फंड साठी काही नियम बनवण्यात आले, तसेच आता खाजगी म्युच्युअल फंड ला सुद्धा परवानगी देण्यात आली होती त्यामुळे गुंतवणूकदार खाजगी म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू लागले.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी तसेच म्युच्युअल फंडचा प्रचार करण्यासाठी 22 ऑगस्ट 1995 मध्ये ॲंम्फी  (The Association of Mutual Funds in India) ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 23 वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये भारतीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैशाची संख्या ही 23,29,782 कोटी इतकी झाली होती.

म्युच्युअल फंड कशा प्रकारे कार्य करतो ? (How Mutual Fund Work in marathi)

म्युच्युअल फंड ही एक कंपनी आहे जी तुमच्याकडून पैसे जमा करत व त्या ठिकाणी एक फंड मॅनेजर नेमलेला असतो जो तुमच्या पैशाला वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्ट करतो व त्यापासून मिळणारा फायदा किंवा नुकसान सगळ्या गुंतवणूकदारांमध्ये वाटप करतो. योग्य वेळेला शेअर बाजार मधून शेअर खरेदी करणे व परत विकणे ही सगळी कामे फंड मॅनेजरची असतात त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा येथे विचार करावा लागत नाही 

तुमची सगळी कामे जसे की पैशाची गुंतवणूक करणे त्यापासून नका कमावणे ही म्युच्युअल फंड द्वारे केले जातात पण त्याबाबतीत म्युच्युअल फंड तुमच्यावर काही सर्विस चार्ज आकारतो ती तुम्हाला म्युच्युअल फंड मधून पैसे काढताना म्युच्युअल फंड कंपनीला द्यावी लागतील.

म्युच्युअल फंड चे प्रकार (Types Of Mutual Fund In Marathi)

साधारणपणे म्युच्युअल फंड चेन चार प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत. 

 • इक्विटी फंड (Equity Fund) 
 • डेट फंड (Debt Fund)
 • हायब्रिड फंड (Hybrid fund)
 • सोलुशन ओरिएंटेड (Solution oriented)

इक्विटी फंड (Equity Funds)

म्युच्युअल फंड मधील सगळ्यात पॉप्युलर फंड म्हणजे इक्विटी फंड यामध्ये खूप जास्त रिस्क असते पण रिटर्न्स सुद्धा जास्त दिले जातात त्यामुळे गुंतवणूकदार मोठी रिस्क घेऊन यामध्ये पैशाची गुंतवणूक करतात इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जमा झालेले पैसे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट केले जाते

इक्वीटी म्युच्युअल फंड ची सुद्धा चार भागांमध्ये वाटप करण्यात आलेले आहे ते खालील प्रमाणे

 • लार्ज कॅप फंड (large Cap Funds)
 • मिड कॅप फंड (Mid Cap Funds)
 • स्मॉल कॅप फंड (Small Cap Funds)
 • मल्टी कॅप फंड (Multi Cap Funds)

लार्ज कॅप फंड (large Cap Funds) : लार्ज कॅप फंड मध्ये रिस्क थोडे कमी असतात कारण यामध्ये अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात ज्या कंपन्या आधीपासूनच मोठ्या झालेल्या आहे यामध्ये रिस्क कमी आहे त्यामुळे सहाजिकच येथे तुम्हाला रिटर्न कमी दिला जातो पण कंपनी आधीपासूनच मोठी झाली असल्यामुळे येथे तुम्हाला नियमित रिटर्न्स मिळतात 

मिड कॅप फंड (Mid Cap Funds): मिड कॅप म्हणजे मिडीयम कंपन्या त्या कंपन्या ज्यांनी त्यांचा व्यापार स्थापन केले आहे व ते आता प्रगतीच्या दिशेने पावले उचलत चाललेली आहे यामध्ये लार्ज कॅप पेक्षा थोडे जास्त रिस्क असतात पण मात्र येथे रिटन सुद्धा जास्त मिळण्याची शक्यता असते 

स्मॉल कॅप फंड (Small Cap Funds):स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या यामध्ये तुमचा पैसा त्या कंपन्यांमध्ये गुंतवला जातो ज्या कंपन्या नवीन आहे किंवा लहान आहेत अशा कंपन्यांमध्ये रिस्क सगळ्यात जास्त असते कारण या कंपन्या कधीही बंद पडू शकतात पण अशा कंपनीमध्ये रिटर्न सुद्धा जास्त दिला जातो.

मल्टी कॅप फंड (Multi Cap Funds): मल्टी कॅप फंड हि  कॅटेगिरी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी एक पॉप्युलर कॅटेगिरी आहे यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या तिन्ही मध्ये पैसे एकसमान गुंतवले जातात.

डेट फंड (Debt Fund)

डेट फंड असे फंड असतात ज्यामध्ये आपल्याला एक ठराविक रक्कम दिली जाते यामध्ये पैसे सेक्युरिटी मध्ये गुंतवले जातात ज्यामध्ये रिस्क ही खूप कमी असते पण यामध्ये रिटन सुद्धा कमी मिळतो.

हायब्रिड फंड (Hybrid fund)

हायब्रिद फंड हा असा म्युच्युअल फंड असतो ज्यामध्ये पैशाची गुंतवणूक ही शेअर मार्केट आणि सेक्युरिटी या दोन्ही मध्ये केले जाते म्हणजे यामध्ये इक्विटी आणि डेट फंड या दोन्ही मध्ये पैशाची गुंतवणूक केली जाते

सोलुशन ओरिएंटेड स्कीम (Solution oriented)

या मध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या धैर्य ला मिळवण्यासाठी पैसे गुंतवले जातात जसे की जर तुम्हाला रिटायरमेंट,मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण साठी पैसे जमा करायचे असेल तर तुम्ही सोलुशन ओरिएंटेड स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतात.

म्युच्युअल फंड खाते उघडण्याची प्रक्रिया ? (Mutual Fund Account Opening Process In Marathi)

म्युच्युअल फंड मध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रोसेस ला फॉलो करावे लागेल.

 • स्टेप 1: ग्रो ॲप्स डाऊनलोड करा त्यासाठी येथे क्लिक करा 
 • स्टेप 2: ग्रो ॲप्स ला तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करून ओपन करा 
 • स्टेप 3: तुमच्या मोबाईल मध्ये उपलब्ध असलेली कोणतीही एक जीमेल आयडी निवडा आणि नेक्स्ट च्या बटणावर क्लिक करा 
 • स्टेप 4;त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा वर सेंड ओटीपी वर क्लिक करा तुमच्याकडे एक फोटो पाठवला जाईल तो प्रविष्ट करा आणि नेक्सट वर क्लिक करा 
 • स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करावे लागेल तुमचा पॅन कार्ड ऑनलाईन व्हेरिफाय केला जाईल 
 • स्टेप 6: पॅन कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव व इन्फॉर्मेशन येईल तुम्हाला फक्त कन्फर्म करावे लागेल 
 • स्टेप 7: त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची केवायसी डिटेल्स द्यावी लागेल जसे की डेट ऑफ बर्थ, जेंडर, मॅरिटल स्टेटस इत्यादी त्यानंतर नेक्स्ट करा 
 • स्टेप 8: त्यानंतर तुम्हाला तुमचे काम, इन्कम, मदर नेम, फादर नेम इत्यादी भरून नेक्स्ट करावे लागेल.
 • स्टेप 9: जर तुम्हाला नॉमिनी ऍड करायची असेल तर तुम्ही नमुनी विषयी माहिती भरू शकता ती माहिती भरून झाल्यावर नेक्स्ट च्या बटणावर क्लिक करा 
 • स्टेप 10: त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक निवडावी लागेल तुमचे खाते ज्या बँक मध्ये असेल ते बँक निवडा व नंतर आयएफसी कोड प्रविष्ट करा जेणेकरून तुमचे बँक ची माहिती तुमच्यासमोर येईल 
 • स्टेप 11: त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर प्रविष्ट करा व व्हेरिफाय वर क्लिक करा बँक व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या बँक मध्ये एक रुपया क्रेडिट केला जाईल 
 • स्टेप 12: बँक व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करावे लागणार त्यासाठी SING वर क्लिक करा व तुमचे सिग्नेचर करा 
 • स्टेप 13: त्यानंतर प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुमचा म्युच्युअल फंड अकाउंट सक्सेसफुलि ओपन होईल.

म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी (Mutual Fund Investment Process in marathi )

आजच्या काळात म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे कारण ऑनलाईन असे बरेच एप्लीकेशन आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात पॉप्युलर एप्लीकेशन म्हणजे Grow Apps.

Grow App च्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी ?

Grow App च्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी यासाठी खाली प्रक्रिया दिलेले आहेत.

 • स्टेप 1: Grow Apps ओपन करा 
 • स्टेप 2:त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर काही म्युच्युअल फंडाचे ऑप्शन दाखवले जातील व सगळ्यात वर सर्च बॉक्स दिला जाईल 
 • स्टेप 3: सर्च बॉक्स मध्ये जर तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडचे नाव माहिती असेल तर त्यामध्ये सर्च करू शकता 
 • स्टेप 4:येथे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातात एक one time payment आणि दुसरे SIP 

One time payment: या मध्ये तुम्ही एकाच वेळेस पैसे इन्व्हेस्ट करू शकता.

SIP: यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करू शकता दर महिन्याला किती पैसे आणि कोणत्या तारखेला SIP भरायची आहे हे तुम्ही SIP चालू करताना ठरवू शकता. SIP बद्दल खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे 

 • स्टेप 5:त्यानंतर तुम्हाला किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे ते प्रविष्ट करा आणि इन्व्हेस्ट वर क्लिक करा 
 • स्टेप 6: नंतर तुमच्या समोर पेमेंट ऑप्शन येतील त्यामधील एक ऑप्शन चा उपयोग करून तुम्हाला पेमेंट करावी लागेल 

अशाप्रकारे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये सहज सोप्या पद्धतीने इन्वेस्ट करू शकता

टीप: कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्या अगोदर त्या फंड बद्दल ची संपूर्ण माहिती करून घेतली पाहिजे जसे की लास्ट इयर मध्ये त्यांनी किती रिटन्स दिलेले आहेत,

SIP काय आहे ?

SIP चा फुल फॉर्म सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आहे SIP हा एक म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा माध्यम आहे मात्र यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस सगळे पैसे द्यावे लागत नाहीत तर तेच पैसे छोट्या छोट्या खिशामध्ये दर महिन्याला तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला द्यावे लागतात. 

उदाहरणार्थ जर तुम्ही फायनान्स वर एखादी गाडी घेतली तर तुम्हाला दर महिन्याला EMI द्यावे लागतात अगदी त्याचप्रमाणे SIP म्हणजे तुम्हाला दर महिन्याला ठरवलेल्या तारखेला पैसे इन्वेस्ट करावे लागेल.

म्युच्युअल फंड चे फायदे ? (Mutual Fund Benefits In Marathi)

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच फायदे आहेत त्यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे दिलेले आहेत

 • म्युच्युअल फंड मध्ये खूप कमी रिस्क असतो कारण इथे एक फंड मॅनेजर नेमलेला असतो जो आपल्या पैशाला वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्ट करतो व त्यापासून नफा कमावतो या मॅनेजर ला शेअर बाजारांमधील अनुभव आणि ज्ञान असतो
 • म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेली रक्कम कधीही काढता येते यामध्ये गुंतवणूकदाराला त्या मार्केट रेट प्रमाणे पैसे मिळतात.
 • म्युच्युअल फंड सरकारी संस्था द्वारे नियंत्रित केले जातात 
 • म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करणे अगदी सोपे आहे 
 • म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला टॅक्स मध्ये काही प्रमाणात सूट मिळते.

म्युच्युअल फंड चे नुकसान ?

ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड चे फायदे आहेत अगदी त्याचप्रमाणे काही नुकसान सुद्धा आहेत ते खालीलप्रमाणे दिलेले आहे

 • म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली रकमेपैकी काही रक्कम म्युच्युअल फंड कंपनी सर्विस चार्ज म्हणून गुंतवणूकदारांकडून घेते.
 • म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणू ककेलेली रक्कम कोणत्या फंडमध्ये गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे नियंत्रण नसते
 • म्युच्युअल फंड मध्ये मिळणारा रिटन्स हा बाजारभावावर अवलंबून असतो बाजार भाव कधी वाढू शकतो किंवा कधी कमी होऊ शकतो

निष्कर्ष

आजच्या Mutual Fund Information in Marathi लेखामध्ये आपण म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे जसे कि म्युच्युअल फंड काय आहे किती प्रकारचे असतात म्युच्युअल फंड चा  इतिहास म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी इत्यादी आता मी आशा करतो की आजचा माझा हा लेख तुम्हाला आवडला असेल व दिलेली सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल

अजूनही या लेखाबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही लवकरात लवकर त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जर हा लेख आवडला असेल तर याला फेसबुक वर शेअर करू शकता व असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी व तुमचे नॉलेज वाढवण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार ब्लॉग ला परत भेट देऊ शकता.

FAQ

म्युच्युअल फंड चे प्रकार किती व ते कोण कोणते आहेत ?

म्युचल फंड ची एकूण चार प्रकार पडतात

इक्विटी फंड (Equity Fund) 
डेट फंड (Debt Fund)
हायब्रिड फंड (Hybrid fund)
सोलुशन ओरिएंटेड (Solution oriented)

SIP म्हणजे काय ?

SIP चा फुल फॉर्म सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आहे SIP हा एक म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा माध्यम आहे

भारतातील पहिला म्युच्युअल फंड कोणता आहे  ?

“युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया”

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

3 thoughts on “Mutual Fund Information in Marathi | म्युच्युअल फंड इतिहास, प्रकार, गुंतवणूक, फायदे 2022”

Leave a Comment