महाशिवरात्रि विषयी माहिती | Mahashivratri Information In Marathi 2022

Mahashivratri Information In Marathi या लेखामध्ये आपण महाशिवरात्र बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. हिंदू धर्मामध्ये अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात व महाशिवरात्रि त्यापैकीच एक आहे. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते, तसेच हा सण महादेवांचे भक्त असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो अनेक जण या दिवशी उपवास सुद्धा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरा मध्ये खूप गर्दी असते कारण त्या दिवशी हजारो महादेवाचे भक्त दर्शनासाठी तेथे एकत्र जमलेले असतात. 

तसेच काही मंदिरांमध्ये महादेवाची पूजा करून भजन, कीर्तन, गायन यासारखे अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. महादेवांना प्रलायचा देवता म्हणून सुद्धा ओळखले जातात, पण जसा कि नाराळ बाहेरून खूप कठोर आणि आतून खूप नाजूक असतो, अगदी त्या सारखेच महादेव सुद्धा प्रलयच्या देवाबरोबर भोलेनाथ पण आहेत. तसेच सूर आणि असुर दोघांसाठी समान असल्यामुळे दोघेही तितक्याच श्रद्धेने महादेवाची पूजा करतात.

Mahashivratri Information In Marathi

आता तुमच्या लक्षात आले असेल की हा सण महादेवाचे भक्त असणाऱ्या लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे. तर चला जाणून घेऊया या सणा बद्दल संपूर्ण माहिती जसे की, महाशिवरात्री का साजरी केली जाते ?  महाशिवरात्रि कधी साजरा केली जाते ? महाशिवरात्रि कशी साजरा केली जाते ?  महाशिवरात्री ची कथा ? महाशिवरात्रीचे महत्त्व ? वेगवेगळ्या भागांमध्ये महाशिवरात्रि कशी साजरा केली जाते ? महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. या लेखांमध्ये (Mahashivratri Information In Marathi) मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

महाशिवरात्रि कधी साजरा केली जाते ?

साधारणता महाशिवरात्रि दरवर्षी इंग्लिश महिन्यानुसार फेब्रुवारी ते मार्चदरम्यान येते. या वर्षी 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रि साजरा केली गेली.

महाशिवरात्रि म्हणजे काय ? (Mahashivratri Information In Marathi)

महाशिवरात्रि हा हिंदू धर्मातील एक सण आहे. ज्या दिवशी हिंदु धर्मातील लोक महादेवाची पूजा करतात व महादेवासाठी उपवास करतात तसेच महादेवाच्या मंदिरामध्ये भजन, कीर्तन, गायन असे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात.

महाशिवरात्री कशी साजरा केली जाते

महाशिवरात्रि हा हिंदू धर्मातील महादेवाच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महादेवाचे भक्त असणारे सगळेजण एकत्र महादेवाच्या मंदिरावर जमतात व भजन कीर्तन गायन असे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. त्याचबरोबर महादेवाच्या शिवलिंग आणि मूर्तीचे अभिषेक देखील करतात व एकादस म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास सुद्धा करतात काही शिवभक्त तर ओम नमः शिवाय नावाचा जप दिवसभर करत असतात. 

काही ठिकाणी महादेवाच्या मंदिरा मध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जातात व मंदिरापुढे या दिवशी यात्रा सुद्धा भरलेली असते. 

महाशिवरात्रीचे महत्व

  • महाशिवरात्रि सणाचा महत्त्व संस्कृत पुराण आणि साहित्या पैकी शिवपुराण, पद्मपुराण व अग्निपुराण या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे 
  • महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती चे विवाह झाले होते 
  • महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केले जातात. तो उपवास दीड दिवसाचा असतो त्यामुळे तो संध्याकाळी न सुटता दुसऱ्या दिवशी सकाळी सुटतो. 
  • महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे बारा ज्योतिर्लिंगच्या ठिकाणी शिवभक्तांची दर्शन घेण्यासाठी खूप जास्त गर्दी लागलेली असते.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय नामाचा जप केला जातो. 

भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाशिवरात्री कशी साजरा केली जाते

भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाशिवरात्री कशा प्रकारे साजरा केली जाते, हे खालीलप्रमाणे दिलेले आहेत.

महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये हा सण अति उत्साहाने साजरा केला जातो या सणाच्या दिवशी एकादस म्हणून महादेवासाठी उपवास केले जाते, तसेच महादेवाच्या शिवलिंगाचे पंचगव्यनी अभिषेक केले जातात व नंतर पूजा करण्यासाठी धोत्रा बेलाची पाने आणि पांढरे फुले या तिघांचा उपयोग केला जातो. व शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करून भजन, कीर्तन, गायन अशी वेगवेगळी कार्यक्रम राबवले जातात.

जम्मू आणि काश्मिर 

जम्मू आणि कश्मीर मध्ये महाशिवरात्री खूप वेगळ्या प्रकारे साजरा केले जाते याठिकाणी महाशिवरात्रि 20 ते 21 दिवसाची असते म्हणजे 20 ते 21 दिवस सतत ते लोक महाशिवरात्री साजरा करत असतात. या ठिकाणी प्रसादासाठी अक्रोड वाटप केले जातात आणि प्रसादासाठी उपयोगात आणणाऱ्या अक्रोड ला दोन ते तीन दिवस अगोदर भिजवून ठेवलेले असतात.

बांगलादेश मधील महाशिवरात्री

ज्या प्रमाणे भारतामध्ये महाशिवरात्रि साजरा केली जाते, अगदी त्याच प्रमाणे बांगलादेश मध्ये सुद्धा हिंदु धर्मातील लोक महाशिवरात्रि साजरा करतात आणि महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास देखील करतात. बांगलादेश मधील लोकांचे असे म्हणणे आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे उपवास केल्याने त्यांना त्यांच्या सोबत संसार करणारी बायको किंवा नवरा चांगला/चांगली मिळतो त्यामुळे त्यादिवशी ते महादेवाची उपवास करतात. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी बांगलादेशमधील काही हिंदू धर्मातील लोक चंद्रनाथ धाम ला फिरायला जातात.

नेपाळमधील महाशिवरात्री

नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरावर महाशिवरात्री खूप विशेष रूपाने साजरा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी काठमांडू मधील पशुपतिनाथ मंदिरावर हजारो शिवभक्तांची गर्दी लागलेली असते. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतासोबत जगामधील वेगवेगळ्या ठिकाणावरून योगी आणि शिवभक्त या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी येतात

महाशिवरात्री पूजा विधी

महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात आधी महादेवाचे प्रतिक असणाऱ्या शिवलिंगाची पंचगव्यनी अभिषेक केले जातात व नंतर पंचामृतानी शिवलिंगाला लेप दिले जातात त्यानंतर पांढरी फुले बेलाची पाने आणि धोत्रा यांनी शिवलिंगाची पूजा केली जाते

महाशिवरात्रीची कथा

भारतामध्ये अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा दिलेली असते तसेच महाशिवरात्री सुद्धा साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे

अमर अमृता चे उत्पादन करण्यासाठी समुद्र कथन करणे खूप गरजेचे होते. पण त्याचबरोबर एका हलाहल नामक घातक विषाची निर्मिती होणार होती. हा हलाहल नामक विष इतका घातक होता व त्यामध्ये एवढी शक्ती होती की तो संपूर्ण ब्रम्हांडाला नष्ट करू शकत होता. हलाहल नामक विष खूप घातक असल्यामुळे त्याला नष्ट करण्याची शक्ती फक्त महादेवामध्ये होती, त्यामुळे महादेवाणी ते विष पिउन घेतले पण हा विषय खूप जास्त घातक असल्यामुळे महादेवांचा गळा निळ्या रंगाचा झालं. यामुळेच महादेवाचे नीलकंठ असे सुद्धा एक नाव आहे. त्यानंतर महादेवांचे उपचार करण्यासाठी तिथे काही वैद्य आले. वैद्याने ब्रह्मांड मधील देवतांना महादेवांना रात्रभर झोपू न देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महादेवांना रात्रभर जागृत ठेवण्यासाठी ब्रम्हांडामधिल देवतांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव त्यांच्या भक्तीवर खूप जास्त खुश झाले व त्यांना आशीर्वाद दिला याच घटनेला शिवरात्र असे म्हणतात.

आज आपण काय शिकलो ?

तर मित्रांनो Mahashivratri Information In Marathi या लेखामध्ये आम्ही तुम्हाला महाशिवरात्रि विषय संपूर्ण माहिती दिलेली आहे. या लेखाविषयी जर तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर या लेकाला फेसबुक वर शेअर करू शकता. असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट देऊ शकता.

FAQ

महाशिवरात्रि कधी साजरा केली जाते ?

साधारणता महाशिवरात्रि दरवर्षी इंग्लिश महिन्यानुसार फेब्रुवारी ते मार्चदरम्यान येथे या वर्षी 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रि साजरा केली गेली.

आम्हाला फॉलो करा

2 thoughts on “महाशिवरात्रि विषयी माहिती | Mahashivratri Information In Marathi 2022”

Leave a Comment