KYC Full Form in Marathi | केवायसी अर्थ, प्रक्रिया, कागदपत्रे | KYC Meaning, Process, Documents, Update

केवायसी अर्थ, प्रक्रिया, कागदपत्रे (KYC Full Form in Marathi, KYC Information In Marathi, Why KYC Is Important, KYC Meaning, Process, Documents, Update)

KYC Full Form in Marathi : मित्रांनो केवायसी हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. कारण आपल्याला अगदी लहानातील लहान कामे करण्यासाठी सुद्धा केवायसी करण्याची गरज पडत आहे. जसे की जर आपल्याला यखांद्या बँकेत खाते उघडायचे असेल तर तेथे केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच पीएफ चे फॉर्म भरण्यासाठी, डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी, यखांद्या कंपनी कडून लोन मिळविण्यासाठी व अजूनही असे बरेच कामे आहेत. ज्यांच्यासाठी आपल्याला केवायसी करणे खूप गरजेची झाली आहे.

KYC Full Form in Marathi

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ? केवायसी म्हणजे नेमकं काय ? केवायसी चा फुल फॉर्म काय आहे ? केवायसी करणे का गरजेचे असतात ? केवायसी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? व केवायसी करण्याची प्रक्रिया काय असते 

आपल्या भारत देशामध्ये असे बरेच व्यक्ती आहेत ज्यांना केवायसी बद्दल संपूर्ण माहिती करून घ्यायची आहेत. व केवायसी का करावी लागते याबद्दल सुद्धा माहिती करून घ्यायची आहे. तर अशाच लोकांसाठी मी आजचा हा लेख लिहिलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला केवायसी बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तर चला मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया आजच्या या लेखाला.

केवायसी म्हणजे काय ? (KYC Information in Marathi)

केवायसी ला मराठीमध्ये “तुमच्या कस्टमरला जाणून घ्या” असेही म्हणतात हा एक प्रकारचा डिजिटल फॉर्म आहे. ज्यावर ग्राहकाचे संपूर्ण माहिती दिलेली असते जसे की नाव, पत्ता, गाव, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते इत्यादी

 म्हणून या सज्ञा चा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त बँका, मोठ्या कंपन्या करताना दिसतात. कारण त्यांना कस्टमर ची सगळी माहिती मिळवायची असते.

या कंपन्यांना आपल्या कडून केवायसी करून घेणे हे बंधनकारक आहे कारण रिझर्व बँकेच्या नियमानुसार त्यांना त्यांच्या ग्राहकाची केवायसी करणे गरजेचे आहे. जेणेकरून बँकांकडे ग्राहकांची योग्य माहिती असेल व फ्रॉड होण्याचे प्रमाण टाळल्या जातील.

केवायसी चे फुल फॉर्म काय आहे ? (KYC Full Form in Marathi)

इंग्लिश मध्ये KYC चे Full Form “Know your customer or Know Your Client” असे होतात तर मराठीमध्ये केवायसी ला तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या असे म्हटले जातात.

हा एक विशेष प्रकारचा व्यक्तिगत माहितीचा फॉर्म असतो जे बँका आपल्याकडून भरून घेतात व ती माहिती बँकेत साठवून ठेवतात. जेणेकरून भविष्यात जर कधी अडचणी आल्या तर बँका आपल्यापर्यंत त्या माहितीच्या आधारावर साहजिकरित्या पोचू शकतात व आपल्याशी संवाद साधने त्यांना अगदी सोप्पे होते.

केवायसी चे प्रकार (KYC Types in marathi)

वर आपण KYC चे Full Form in Marathi बद्दल माहिती करून घेतली आहे. आता आपण KYC च्या प्रकाराविषयी माहिती करूया. साधारणता केवायसी चे दोन प्रकार पडतात 

  • E-KYC
  • C-KYC

केवायसी चे प्रकार

  1. E-KYC चा फुल फॉर्म“Electronically Know Your Customer” इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या असा होतो. याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही प्रोसेस सगळी डिजिटल पद्धतीने केली जाते. व आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे Physical डॉक्युमेंट घेतली जात नाही. डिजिटली माहिती गोळा करणे आता अगदी सोपे झाले आहे. त्यामध्ये फक्त तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.  
  2. C-KYC हा सुद्धा एक केवायसी चा प्रकार आहे. याचे फुल फॉर्म “Central Know Your Customer” असे होतात अशा प्रकारची केवायसी विशेषतः बँका आणि वित्तीय संस्था द्वारे केली जाते त्याचबरोबर इन्शुरन्स आणि शेअर मार्केट मध्ये सुद्धा सी केवायसी केली जाते. यामध्ये तुमच्याकडून बँका फिजिकल पद्धतीने फॉर्म भरून घेतात व त्यासोबत तुमचे कागदपत्रे सुद्धा जमा करायला लावतात.

केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे (KYC Document)

केवायसी करण्यासाठी लागणार्‍या सगळ्या कागदपत्राची लिस्ट खालीलप्रमाणे दिलेली आहे.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मतदान कार्ड 
  • ड्रायव्हिंग लायसन्स

केवायसी कशी करावी ?

मित्रांनो आता प्रश्न उरतो तो म्हणजे केवायसी कशी करावी ?  तर केवायसी करणे हे फार अवघड नाही ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करायला सांगितले जातात. त्याच ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म केवायसी चा असतो. त्यामध्ये तुमच्या बद्दल काही माहिती विचारली जाते. जसे की तुमचे नाव, मोबाईल, नंबर, पत्ता, एड्रेस, पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर इत्यादी. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म येथे सबमिट करावे लागेल, व त्या फॉर्म बरोबर काही महत्वाचे कागदपत्र जोडावे लागेल. जसे की आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्ड चे झेरॉक्स अशाप्रकारे तुम्ही तुमची केवायसी करू शकता.

केवायसी करणे का गरजेचे आहेत (Why KYC Is Important)

मित्रांनो केवायसी करणे का गरजेचे आहे. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच कधी ना कधी पडला असेल. तर जसे की आपण वर लेखांमध्ये पाहिले की केवायसी ही एक प्रोसेस आहे. ज्याद्वारे बँका आपल्या ग्राहकाची माहिती जमा करतात व केवायसी चा अर्थ ही आपल्या ग्राहकाला जाणून घ्या असा होतो. 

समजा जर एखांदा व्यक्ती बँकेमध्ये लोन घेण्यासाठी गेला. तर सगळ्यात आधी लोन देण्या अगोदर बँकेकडून त्या व्यक्तीची केवायसी केली जाते. व त्याद्वारे हे तपासले जातात की तो व्यक्ती खरा आहे की फ्रॉड. केवायसी पूर्ण झाल्यानंतर बँकेकडे त्या व्यक्तीचे सगळी माहिती येते जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीने फ्रॉड करायचा प्रयत्न केला असेल तर तो लगेच पकडला जातो. किंवा जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घेतलेले लोन परत केले नाही तर बँक केवायसी मधील माहितीच्या आधारावर त्या व्यक्तीं बरोबर संपर्क साधू शकतात.

केवायसी करताना हे लक्षात ठेवा

मित्रांनो या डिजिटल युगामध्ये आता सगळी माणसे ऑनलाइन पेमेंट कडे वळत चाललेले आहे. कारण ऑनलाइन पेमेंट करणे अगदी सोपे आहे व त्यासाठी आपल्याला खिशामध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता वेगवेगळे ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. व त्यामध्ये ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता आपल्याला केवायसी करावी लागते. 

याच गोष्टीचा फायदा फ्रॉड लोक जास्तीत जास्त घेत आहे. या कंपनीच्या नावावर फ्रॉड करणारी माणसे तुम्हाला फोन करतात व केवायसी करायला सांगतात. आणि तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती मागतात व त्यासोबतच तुमच्या बँकेत बद्दलची माहिती सुद्धा विचारतात. जसे की एटीएम नंबर, बँक खाते क्रमांक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओटीपी मागतात. तुम्ही जर त्या व्यक्तीला ओटीपी दिले तर तो व्यक्ती तुमच्या बँकेमधील सगळे पैसे काढू शकतो. 

त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा की कोणत्याही बँका केवायसी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माहिती देण्या करीत विनंती करत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोन येत असेल व त्यामध्ये तुमच्या बँकेत बद्दलची माहिती देण्या करीत विनंती करत असेल तर अशा व्यक्ती पासून तुम्ही नेहमी सावध राहायला पाहिजे व त्या व्यक्तींना कोणतीच माहिती दिली नाही पाहिजे.

निष्कर्ष

आजच्या KYC Full Form in Marathi या लेखामध्ये आपण केवायसी बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला सगळी कळली असेल व आता तुमच्या मनामध्ये केवायसी विषयक अजून काही प्रश्न उरले नसतील किंवा अजूनही काही प्रश्न उरले असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी परत इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला विजीट करू शकता.

FAQ

केवायसी चे किती प्रकार पडतात ?

केवायसी चे दोन प्रकार पडतात EKYC आणि CKYC

केवायसी कुठे कुठे मागितले जाते ?

केवायसी ही वित्तीय संस्था, बँकिंग क्षेत्र, शेअर मार्केट इन्शुरन्स आणि कोणत्याही कंपनी मधून पीएफ काढता वेळेस मागितली झाले.

केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे ?

आधार कार्ड 
पॅन कार्ड 
पासपोर्ट साईज फोटो 
मतदान कार्ड 
ड्रायव्हिंग लायसन्स

केवायसी चे फुल फॉर्म काय आहे ? (KYC Full Form in Marathi)

इंग्लिश मध्ये KYC चे Full Form “Know your customer or Know Your Client” असे होतात तर मराठीमध्ये केवायसी ला तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या असे सुद्धा म्हटले जातात

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

2 thoughts on “KYC Full Form in Marathi | केवायसी अर्थ, प्रक्रिया, कागदपत्रे | KYC Meaning, Process, Documents, Update”

Leave a Comment