आता पाठवा Amazon Pay Balance थेट तुमच्या बँक खात्यात, ही आहे एक सोपी पद्धत 

आता तुम्ही तुमच्या Amazon Pay च्या Wallet मधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे कसे ट्रान्सफर करावे त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला एक मार्ग सांगितलेले आहे त्यामुळे हा लेख पूर्ण नक्की वाचा

Amazon pay to bank transfer

तुम्हाला Amazon गिफ्ट कार्ड मिळाले आहे आणि ते रिडीम केल्यानंतर, Amazon Pay वॉलेटमध्ये पैसे जोडले गेले आहेत, तसे असल्यास, तुम्ही या वॉलेटमधून खरेदी करू शकता. पण तुम्हाला Amazon वरून नाही तर इतर कोणत्याही शॉपिंग साइटवरून खरेदी करायची असेल, तर तुम्ही हे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. बऱ्याच लोकांना Amazon Pay wallet मधून बँक खात्यात पैसे कसे पाठवायचे हे कदाचित समजत नसेल. म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक सोपा मार्ग सांगत आहोत. ज्याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या ऍमेझॉन पे वॉलेट मधून तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता. 

पण त्याआधी आम्ही तुम्हाला सांगतो की फक्त तेच यूजर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, ज्यांनी त्यांचे KYC पूर्ण केले असेल. Amazon KYC पडताळणी मोफत केली जाते आणि त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. त्यामुळे तुमचे केवायसी पूर्ण झाले नसेल, तर सर्वप्रथम तुम्ही ॲमेझॉन वर केवायसी कसे पूर्ण करावे हे समजून घेतले पाहिजे.

  • सर्व प्रथम Amazon app वर जा आणि KYC विभागात जा.
  • – तुमचा सेल्फी काढा आणि त्याला त्या ठिकाणी अपलोड करा आणि तुमचे ओळखपत्र सुद्धा अपलोड करा.
  • तुमच्या आधार कार्डची पडताळणी करा.
  • आता Amazon एजंट व्हिडिओ कॉलद्वारे तुमची पडताळणी करेल.

KYC नंतर, तुम्ही Amazon Pay wallet मधून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. कसे ते येथे जाणून घ्या.

1- Amazon ॲप वर जा.

2- आता तुमच्या Amazon Pay विभागात जा

3- send money वर क्लिक करा.

4- आता ‘To Bank’ पर्याय निवडा.

5- नंतर IFSC कोड, खाते क्रमांक आणि खातेधारकाचे नाव भरा. त्यानंतर Pay Now वर क्लिक करा.

6- आता तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम टाका आणि Continue वर क्लिक करा.

7- त्यानंतर तुम्हाला ॲप्स स्क्रीनवर पेमेंट पद्धत दिसेल. Show more ways वर क्लिक करा आणि Amazon Pay balance वर क्लिक करा.

8 – आता Continue वर क्लिक करा. पैसे तुमच्या बँक खात्यात जातील.

1 thought on “<strong>आता पाठवा Amazon Pay Balance थेट तुमच्या बँक खात्यात, ही आहे एक सोपी पद्धत </strong>”

Leave a Comment