Instagram Information In Marathi 2022丨इंस्टाग्राम म्हणजे काय व एक इंस्टाग्राम खाते कसे तयार करावे丨What Is Instagra ?

इंस्टाग्राम म्हणजे काय व एक इंस्टाग्राम खाते कसे तयार कराव(What Is Instagram,Instagram Information In Marathi 2022, instagram History, Instagram Account Create Process in marathi)

इंटरनेटच्या युगामध्ये आज सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा उपयोग होत आहे आणि दिवसेंदिवस सोशल मीडिया बद्दल लोकांची रूची वाढत चाललेली आहे. थोडीशी का होईना पण आज अगदी लहान लहान मुलांना सुद्धा इंस्टाग्राम बद्दल माहिती आहे, कारण जेव्हा पासून इंस्टाग्राम नि नवीन फीचर्स इंस्टाग्राम रिल्स मार्केटमध्ये आणलेला आहे. तेव्हापासून इंस्टाग्राम हा सोशल मीडिया, सगळ्यांचाच आवडता झालेला आहेत. 

इंस्टाग्राम हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या सेलेब्रिटी चे चित्र येतात कारण इन्स्टाग्राम असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जिथे आपण आपल्याला आवडणाऱ्या सेलिब्रिटींना फॉलो करू शकतो व त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील सगळ्या मोमेंट्स पाहू शकतो. 

आज-काल इंस्टाग्राम बद्दल थोडीशी माहिती तर सगळ्यांनाच आहे पण त्यातही काही जण असे आहेत. ज्यांना इंस्टाग्राम बद्दल संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे. त्यामुळेच मी हा विचार केला की, जर आपण एक इंस्टाग्राम बद्दल लेख लिहिले. व त्यामध्ये इंस्टाग्राम बद्दल संपूर्ण माहिती दिली तर ज्या लोकांना या विषयाबद्दल माहिती करून घ्यायचे आहे. त्यांना Instagram Information In Marathi हा लेख खूप उपयोगी पडेल. म्हणूनच मी हा लेख लिहिलेला आहे. या लेखाला पूर्ण नक्की वाचावे जेणेकरून तुमच्या मनातील इंस्टाग्राम बद्दल च्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतील.

Table of Contents

इंस्टाग्राम चा इतिहास (Instagram History)

इंस्टाग्राम ची सुरुवात 2010 मध्ये Kevin Systrom आणि Mike Krieger या दोघांनी मिळून केली. सगळ्यात आधी इंस्टाग्राम हे ॲप्लिकेशन ऑक्टोंबर 2010 मध्ये आयओएस ऑपरेटिंग सिस्टमसाठी फ्री मध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर अगदी दोन वर्षांमध्ये म्हणजे 2012 मध्ये या ॲप्लिकेशन चे 10 कोटी Users झाले होते. इंस्टाग्राम चे या वाढत्या पॉपुलरटीला पाहिल्यानंतर, फेसबूक ने 2012 मध्ये पूर्णपणे एक हजार मिलियन डॉलर मध्ये इंस्टाग्रामला विकत घेतले. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांमध्ये इंस्टाग्राम युजर्सची संख्या 30 कोटींवर पोहोचली होती. 

इंस्टाग्राम म्हणजे काय ? (Instagram Information In Marathi)

Instagram Information In Marathi

अगदी सोप्या भाषेत सांगायचे असेल तर इंस्टाग्राम असा एक फ्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जिथे आपण आपल्या सगळ्या मित्रांन बरोबर डिजिटली संवाद साधू शकतो. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करू शकतो त्यांनी शेअर केलेले फोटोज आणि व्हीडिओज पाहू शकतो. तसेच आपणही फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करू शकतो. शेअर केलेल्या फोटोमध्ये लाईक आणि कमेंट्स चे ऑप्शन सुद्धा दिलेले असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीचे फोटोज, व्हिडिओज आपल्याला आवडतात त्यावर आपण लाईक कमेंट करू शकतो.

इंस्टाग्रामच्या सगळ्या सेवा मोफत मध्ये वापरण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम वर स्वतःचे एक खाते तयार करावे लागेल तर चला माहिती करून घेऊया इंस्टाग्राम वर एक खाते कसे तयार करावे.

इंस्टाग्राम वर एक खाते कसे तयार करावे (Instagram Account Create Process in marathi)

इंस्टाग्राम वर एक खाते तयार करणे अगदी सोपे आहे. तुम्ही दोन प्रकारे इंस्टाग्राम अकाउंट तयार करू शकता एक मोबाईल मध्ये मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आणि दुसरे कम्प्युटर मध्यें इंस्टाग्राम ची ऑफिशिअल वेबसाईट वर पण त्यासाठी तुमच्याकडे एक ईमेल आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्ड असायला पाहिजे. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने कोणताही ठेवू शकता. इंस्टाग्राम खाते तयार करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे दिलेली आहे

मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने इंस्टाग्राम खाते तयार करणे

 • सगळ्यात आधी इंस्टाग्राम अप्लिकेशन ला प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा.  
 • इंस्टाग्राम एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा आणि ओपन करा
 • ओपन केल्यानंतर तुम्ही Sign up चा पर्याय निवडा
Instagram Information In Marathi
 • त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारचा पेज येईल. त्यामध्ये विचारलेली माहिती अचूक पणे भरा. तुम्ही सरळ फेसबुकच्या मदतीने सुद्धा Sign Up करू शकता. त्यासाठी Log in with facebook या पर्यायावर क्लिक करा. 

तुम्ही जर ईमेल आयडी ने साइन अप करायचा पर्याय निवडला असेल तर खाली दिलेल्या प्रमाणे माहिती भरा 

 • पहिल्या बॉक्स मधे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी प्रविष्ट करा.
 • दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचे नाव प्रविष्ट करा. 
 • त्यानंतर तुमच्या इंस्टाग्राम खाण्यासाठी एक युजरनेम तयार करा. 
 • नंतर तुमच्या खात्यासाठी एक पासवर्ड तयार करा पण पासवर्ड काही अशा प्रकारे तयार करा. जो तुम्हाला लक्षात राहील कारण परत जेव्हा कधी तुम्हाला इंस्टाग्रामच्या खात्यामध्ये लॉगिन करायचे असेल, त्या वेळेस तुम्हाला युजर नेम आणि पासवर्डची गरज पडेल. 
 • सगळी माहिती प्रविष्ट केल्यानंतर खालील साइन अप (sign up) बटन वर क्लिक करा. 

कम्प्युटरच्या मदतीने इंस्टाग्राम खाते तयार करणे

कम्प्युटरच्या मदतीने इंस्टाग्राम खाते तयार करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रिये वापर करा 

 • सगळ्यात आधी इंस्टाग्राम च्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या. 
 • इथे पण तुम्हाला खाते तयार करण्यासाठी ईमेल आयडी किंवा फेसबुक अकाउंट ची गरज पडेल. 
 • येथेही ईमेल आयडीने खाते तयार करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲप्लिकेशन सारखीच आहे. 

इंस्टाग्राम चे वैशिष्ट्य (Instagram features)

 1. इंस्टाग्राम चा उपयोग आपण मुख्यतःहा फोटोज आणि व्हीडिओज शेअर करण्यासाठी करतो. पण यापेक्षा अधिक इंस्टाग्राम मध्ये असे काही वैशिष्ट्य दिलेले आहे. जे या इंस्टाग्राम ला दुसऱ्या सोशल मीडिया पासून वेगळे करतात ते विशिष्ट खालील प्रमाणे. 
 2. इंस्टाग्राम मध्ये फोटोज अपलोड करता वेळेस तुम्हाला फिल्टरचा ऑप्शन दिला जातो. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या फोटोला अधिक चांगले करू शकता. सध्याच्या स्थितीत इंस्टाग्राम मध्ये 25 फिल्टर्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही एका फोटोला पंचवीस प्रकारे बनवू शकता.
 3. इंस्टाग्राम मध्ये DM चा एक ऑप्शन दिलेला आहे DM म्हणजे Direct Massege म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला फॉलो न करता डायरेक्ट मेसेज पाठवू शकता. 
 4. इंस्टाग्राम मध्ये फोटो अपलोड करता वेळेस तुम्ही त्या फोटोसाठी एक कॅप्शन लिहू शकता व वेळ आल्यावर त्या कॅप्शन ला एडिट सुद्धा करू शकता.
 5. इंस्टाग्राम मध्ये फोटो अपलोड करता वेळेस तुम्ही तुम्हाला हवा तसा फोटोला कोणत्याही बाजूला वळू शकता पण त्यासाठी तुम्हाला फोटोची साईज 1:1 एवढी ठेवावी लागेल
 6. इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही दुसऱ्या सोशल मीडिया अकाउंट सोबत सुधा जोडू शकता. त्या मध्ये सगळ्यात आधी फेसबुक येतो फेसबूक सोबत इंस्ताग्रम अकाऊंत जोडणे खूप सोपे आहे 
 7. तसेच इंस्टाग्राम मध्ये लोकेशन सेट करण्यासाठी तुम्ही वर्ल्ड मॅप चा उपयोग करू शकता. हा नुकताच आलेला फीचर्स आहे 
 8. तसेच इंस्टाग्राम वर अपलोड केलेले फोटो तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करू शकता त्यासाठी इंस्टाग्राम मध्ये शेअर चा ऑप्शन दिलेला असतो 

इंस्टाग्राम चा वापर कसा करावा

इंस्टाग्राम चे खाते तयार झाल्यानंतर आता आपण त्याचा वापर कसा करावा हे शिकणार आहोत. इंस्टाग्राम मध्ये मुख्यतः 5 ऑप्शन दिलेले असतात. सगळ्या ऑप्शन विषयी खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे. 

होम

येथे सगळ्यात वरच्या बाजूला स्टोरीचे आयकॉन दिलेले असतात. त्यामध्ये तुमची स्टोरी आणि ज्या व्यक्तीला तुम्ही फॉलो केलेले आहेत त्या व्यक्तीची स्टोरी तुम्हाला दिसते. जसे व्हाट्सअप मध्ये आपण आपल्या फोन मध्ये सेव असलेल्या मोबाईल नंबर ने त्या व्यक्तीचे स्टेटस पाहू शकतो. त्याचप्रकारे इंस्टाग्राम मध्ये स्टोरी दिलेल्या असतात.

त्यानंतर या पेज वर तुम्ही फोलो केलेल्या व्यक्तींचे फोटोज तुम्हाला दिसू लागतात. ज्यांना तुम्ही लाईक करू शकता व त्यावर कमेंट सुद्धा करू शकता 

सर्च 

सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या अकाउंट दाखवल्या जातात जे इंस्टाग्राम वर जास्तीत जास्त पाहिले जातात किंवा लोकप्रिय आहे.

सर्च बटनच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला इंस्टाग्राम वर शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा इंस्टाग्राम युजरनेम माहिती असायला हवा.

रिल्स

इंस्टाग्राम मधील तिसरा जो बटन दिलेला आहे तो रिल्सचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम वरील रिल्स पाहू शकता

लव आयकाँन

या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याला मिळालेले लाईक कमेंट आणि फॉलॉवर बद्दलची माहिती येथे पाहू शकता.

प्रोफाइल

5 वा आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे प्रोफाईल. इथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईल बद्दल ची सगळी माहिती दिली जाते. ज्याला तुम्ही एडिट करू शकता त्याचबरोबर तुमचे सध्याच्या स्थितीत किती फॉलॉवर आहे व तुम्ही किती जणांना फॉलो केले आहे ते सुद्धा दाखवले जातात तसेच तिथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सुद्धा दर्शवली जाते. 

इंस्टाग्राम स्टोरी म्हणजे काय ?

इंस्टाग्राम स्टोरी इंस्टाग्राम मधील एक फिचर्स आहे ज्यावर तुम्ही 24 तासांसाठी फोटोज किंवा व्हिडीओज अपलोड करू शकता. ज्या प्रकारे आपण व्हाट्सअप मध्ये स्टेटस ठेवतो अगदी तशाच प्रकारे इंस्टाग्राम मध्ये स्टोरी चा ऑप्शन दिलेला आहे. स्टोरी मध्ये अपलोड केलेले व्हिडिओ किंवा फोटो 24 तासानंतर आपोआप डिलीट होतात. 

इंस्टाग्राम रिल्स म्हणजे काय

इंस्टाग्राम रिल्स इंस्टाग्राम मध्ये नुकताच आलेला एक फीचर्स आहे ज्यामध्ये तुम्ही 60 सेकंदाचा व्हिडीओ तयार करू शकता व ते अपलोड करू शकता. त्यानंतर ते व्हिडीओ पब्लिकली दाखवली जातात व ज्या लोकांना तुमचा व्हिडिओ आवडेल ते त्यावर लाईक कमेंट करू शकतात. इंस्टाग्राम च्या या रील्स फिचर्समुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे तसेच काही लोक याचा मनोरंजनासाठी उपयोग करतात. 

इंस्टाग्राम ला हॅक होण्यापासून कसे वाचवावे

इंस्टाग्राम अकाउंट हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी आधी तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की एक हॅकर कोण कोणत्या पद्धतीने तुमचा इंस्टाग्राम अकाउंट हॅक करू शकतात. जेणेकरून यापुढे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला  हॅक होण्यापासून वाचवू शकाल एक हॅकर इंस्टाग्राम अकाउंट कोण कोणत्या पद्धतीने हॅक करू शकतो त्या बद्दल ची सगळी माहिती मी खाली दिलेली आहे 

Keylogger

Keylogger एक इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याची पद्धत आहे Keylogger एक असा स्पेशल सॉफ्टवेअर आहे जो कीबोर्डच्या सगळ्या हालचाली वर लक्ष ठेवतो व ती माहिती एका फाईल मध्ये सेव्ह करून ठेवतो ज्याला परत कधीही एक्सेस करता येते. 

अशा वेळेस जेव्हा युजर्स त्याच्या अकाउंटमध्ये युजरनेम आणि पासवर्ड ने लॉग इन करतो. त्यावेळेस त्याचा युजरनेम आणि पासवर्ड सुद्धा सेव होतो याच्या मदतीने हॅकर्स त्याचा अकाउंट हॅक करतात.

Phishing

Phishing ही सुद्धा एक इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याची जुनी पद्धत आहे Phishing हे ऑनलाईन अकाऊंट हॅक करण्याची खूप फेमस पद्धत आहे. यामध्ये हॅकर एक खोटे लॉगिन पेज तयार करतात जे एकदम ओरिजिनल पेज सारखे दिसतात. जेव्हा युजर्स त्या पेजचा वापर करून इंस्टाग्राम अकाउंट मध्ये लोगिन करतो त्यावेळेस त्याचा युजरनेम आणि पासवर्ड एका फाईलमध्ये आपोआप सेव्ह होतो. त्यानंतर त्याला इंस्टाग्राम च्या ओरिजनल पेजवर हॅकर रीडायरेक्ट करतात. 

ऐकण्यामध्ये हे इतके सोपे वाढत आहे. पण इंस्टाग्राम सारखे ओरिजनल पेज तयार करणे जवळजवळ अशक्य नाही आहे. पण अशक्य सुद्धा नाही आहे 

10 जगातील इंस्टाग्राम वरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती मार्च 2022:

AccountFollower in million
Instagram (@instagram)478
Cristiano Ronaldo (@cristiano)410
Kylie Jenner (@kyliejenner)316
Lionel Messi (@leomessi)310
Dwayne “The Rock” Johnson (@therock)302
Selena Gomez (@selenagomez)301
Ariana Grande (@arianagrande)298
Kim Kardashian (@kimkardashian)290
Beyoncé Knowles (@beyonce)241
Khloe Kardashian (@khloekardashian)224

आज आपण काय शिकलो

आजच्या या पोस्टमध्ये आपण Instagram Information In Marathi याच्या बद्दल संपूर्ण माहिती घेतली. जसे की इंस्टाग्राम काय आहे एक इंस्टाग्राम खाते कसे तयार करावे इत्यादी तुम्ही जर या लेखाला पूर्ण वाचला असेल तर तुमच्या मनातील इंस्टाग्राम विषयी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाले असेल. पण अजूनही तुमच्या मनामध्ये इंस्टाग्राम विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स आम्हाला विचारू शकता आम्ही लवकरात लवकर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करु व जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर या लेखला शेअर करा व असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा.

हे वाचलं का 

आम्हाला फॉलो करा 

FAQ

इंस्टाग्राम म्हणजे काय ?

अगदी सोप्या भाषेत सांगायचे असेल तर इंस्टाग्राम असा एक फ्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या सगळ्या मित्रांना बरोबर डिजिटली संवाद साधू शकतो. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करू शकतो त्यांनी शेअर केलेले फोटोज आणि व्हीडिओज पाहू शकतो

इंस्टाग्राम स्टोरी म्हणजे काय ?

इंस्टाग्राम स्टोरी इंस्टाग्राम मधील एक फिचर्स आहे ज्यावर तुम्ही 24 तासांसाठी फोटोज किंवा व्हिडीओज अपलोड करू शकता. ज्या प्रकारे आपण व्हाट्सअप मध्ये स्टेटस ठेवतो अगदी तशाच प्रकारे इंस्टाग्राम मध्ये स्टोरी चा ऑप्शन दिलेला आहे. स्टोरी मध्ये अपलोड केलेले व्हिडिओ किंवा फोटो 24 तासानंतर आपोआप डिलीट होतात. 

इंस्टाग्राम रिल्स म्हणजे काय ?

इंस्टाग्राम रिल्स इंस्टाग्राम मध्ये नुकताच आलेला एक फीचर्स आहे ज्यामध्ये तुम्ही 60 सेकंदाचा व्हिडीओ तयार करू शकता व ते अपलोड करू शकता. त्यानंतर ते व्हिडीओ पब्लिकली दाखवली जातात व ज्या लोकांना तुमचा व्हिडिओ आवडेल ते त्यावर लाईक कमेंट करू शकतात. इंस्टाग्राम च्या या रील्स फिचर्समुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे तसेच काही लोक याचा मनोरंजनासाठी उपयोग करतात. 

3 thoughts on “Instagram Information In Marathi 2022丨इंस्टाग्राम म्हणजे काय व एक इंस्टाग्राम खाते कसे तयार करावे丨What Is Instagra ?”

Leave a Comment