फोनेपे चे खाते कसे तयार करावे | How to Create Phonepe Account In Marathi

How to Create Phonepe Account In Marathi, How To Add Bank account In Phonepe (फोनपे चे खाते कसे तयार करावे, फोनपे मध्ये खाते ॲड करण्याची प्रक्रिया)

नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही ?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण फोनपे चे खाते कसे तयार करावे (How to Create Phonepe Account In Marathi) याबद्दल शिकणार आहोत. पण त्याआधी आपण फोनपे बद्दल थोडीशी माहिती करून घेऊ व त्यानंतर खाते उघडण्याच्या प्रक्रियकडे वळू. 

फोनपे ही एक डिजिटल पेमेंटची सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. आजच्या काळामध्ये जास्ततीत जास्त डिजिटल पेमेंटचा उपयोग होत चाललेला आहे. त्यामुळे लोकांची फोनपे या ॲप्लिकेशन बद्दल रुची थोडी जास्त आहे, कारण या अप्लिकेशन च्या मदतीने डिजिटल पेमेंट करणे अगदी सोपे आहे. त्याचबरोबर फोनपे कंपनी अशा बऱ्याच सुविधा आपल्याला प्रदान करते ज्यांचा उपयोग आपण घरी बसल्या आणि विनामूल्य करू शकतो.

 How to Create Phonepe Account In Marathi

जसेकी ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाइन लोन पेमेंट करणे, विजेचे बिल भरणे, रेंट पेमेंट करणे, गॅस सिलेंडर बुक करणे इत्यादी. पण या सगळ्या सुविधांचा उपयोग करण्यासाठी तुमच्याकडे फोनपे चे एक खाते असायला हवे. 

फोनपे चे खाते कसे तयार करावे (How to Create Phonepe Account In Marathi) याबद्दल आम्ही या लेखामध्ये सविस्तर पणे क्रमाक्रमाने माहिती दिलेली आहे त्यामुळे हा लेख पूर्ण नक्की वाचा.

Table of Contents

फोनपे चे खाते कसे तयार करावे (How to Create Phonepe Account In Marathi)

फोनपे चे खाते तयार करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेली आहे.

 • फोनपेची अप्लिकेशन डाऊनलोड करा
 • एप्लीकेशन ओपन करून रजिस्टर वर क्लिक करा
 • तुमच्याविषयी माहिती भरा (मोबाईल नंबर, पूर्ण नाव, पासवर्ड) 
 • नंतर कंटिन्यू वर क्लिक करा 
 • फोनपेची भाषा निवडा 
 • एड बँक अकाउंट वर क्लिक करा 
 • तुमचा मोबाईल नंबर लिंक असलेली बँक निवडा 
 • तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा 
 • यूपीआय आयडी सेट करा 
 • युपीआय पिन सेट कार 

स्टेप 1) फोनपेची अप्लिकेशन डाऊनलोड करा

फोनपे चे खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर वरून फोनपे ची अप्लिकेशन डाऊनलोड करावी लागेल. त्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा पण जर आधीपासूनच तुमच्या मोबाईल फोन मध्ये फोनपे ची अप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल केलेली असेल तर तुम्हाला परत ती डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्याची गरज नाही.

स्टेप 2) एप्लीकेशन ओपन करून रजिस्टर वर क्लिक करा

Phonepe app register

एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तिला ओपन करा आणि नंतर Register Now वर क्लिक

स्टेप 3) तुमच्याविषयी माहिती भरा (मोबाईल नंबर, पूर्ण नाव, पासवर्ड) 

Register Now वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोनपेचे नवीन खाते उघडण्याचा फॉर्म येईल तो तुम्हाला भरावा लागेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती तुम्ही खाली मी सांगितल्याप्रमाणे भरा

Phonepe Add your Information
 • Mobile Number– येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल, लक्षात ठेवा मोबाईल नंबर भरताना तोच मोबाईल नंबर भरा जो तुम्ही तुमच्या बँकेमध्ये लिंग केलेला व चालू असेल कारण त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल ज्याद्वारे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय केले जातील.
 • Full Nane– येथे तुम्हाला तुमचा पूर्ण नाव लिहावे लागेल. 
 • Password- मोबाईल नंबर आणि तुमचे पूर्ण नाव प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनपे साठी एक पासवर्ड तयार करावा लागेल, पासवर्ड तुम्ही कोणत्याही प्रकारचा तयार करू शकता पण तो नेहमी तुमच्या लक्षात राहील असा तयार करा. या पासवर्डची तुम्हाला परत फोनपे मध्ये लॉगिन करण्यासाठी गरज पडेल.

वर सांगितल्याप्रमाणे सगळी माहिती भरुन झाल्यानंतर Continue वर क्लिक करा 

स्टेप 4) फोनपेची भाषा निवडा 

त्यानंतर तुम्हाला फोनपे ची अप्लिकेशन कोणत्या भाषेमध्ये वापरायची आहे. ते विचारले जाईल जर तुम्हाला इंग्लिश मध्ये फोनपे वापरायचे असेल तर तुम्ही OK वर क्लिक करून पुढे जाऊ शकता. नाहीतर View more languages च्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात ती भाषा निवडू शकता.

आता तुम्हाला तुमच्या फोनपे मध्ये तुमचा बँक अकाउंट ॲड करावा लागेल त्याची सगळी प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेली आहे

फोनपे मध्ये खाते जोडण्याची करण्याची प्रक्रिया (How To Add Bank account In Phonepe) 

स्टेप 1) एड बँक अकाउंट वर क्लिक करा 

आता तुम्हाला फोनपे मध्ये बँक अकाउंट Add करावे लागेल त्यासाठी Add bank वर क्लिक करा. 

स्टेप 2) तुमचा मोबाईल नंबर लिंक असलेली बँक निवडा 

या ठिकाणी ज्या बँकेमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला असेल ती बँक निवडा आणि जर तुमचा मोबाईल नंबर एका पेक्षा अधिक बँकेमध्ये लिंक असेल तर तुम्हाला जी बँक फोनपे मध्ये ऍड करायचे असेल ती निवडा.

स्टेप 3) तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वरून एक SMS पाठवावा लागेल. जर तुमच्या मोबाईल फोन मध्ये एकच SIM असेल तर तुम्ही सेंड SMS वर क्लिक करा नाहीतर Click Here वर करून जो सिम कार्ड तुमच्या बँकेमध्ये लिंक आहे. तो निवडा आणि नंतर त्यावरून SMS पाठवा त्यासाठी तुमच्या सिमकार्ड मध्ये बॅलेन्स असायला हवे. 

स्टेप 4) यूपीआय आयडी सेट करा 

मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक UPI ID सेट करावी लागेल यूपी आयडी तुम्ही तुमच्या मताने तुम्हाला हवी तशी तयार करू शकता, पण ती एक युनिक आयडी असायला हवी. या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सुद्धा ठेवू शकता. UPI Id तयार करून झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी CONTINUE वर क्लिक.

स्टेप 5) युपीआय पिन सेट कार 

आत्ता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एक UPI PIN  सेट करावा लागेल. याची गरज तुम्हाला फोनपे मधून कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन करताना पडेल UPI PIN SET करण्यासाठी SET UPI PIN वर क्लिक करा व तिथे विचारल्या प्रमाणे डेबिट कार्ड ची माहिती भरा आणि पिन सेट करा.

आता तुमचा फोनपे अकाउंट पूर्णपणे तयार झालेला आहे ज्याला तुम्ही कोणतेही दुकानावर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी व तुमचे मोबाईल रीचार्ज करण्यासाठी आणि इतर कोणतीही पेमेंट करण्यासाठी वापरू शकता.

आज आपण काय शिकलो

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण फोनपे चे खाते कसे तयार करावे(How to Create Phonepe Account In Marathi) व त्यामध्ये बँक अकाउंट कसे ॲड करावे याबद्दल सविस्तर माहिती करून घेतलेली आहे. आता मी अशी आशा करतो की तुम्हाला तुमचा फोनपे अकाउंट तयार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आजचा आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर या लेखाला फेसबुक वर नक्की शेअर करा व तसेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट द्या

FAQ

फोनपे चे खाते कसे तयार करावे (How to Create Phonepe Account In Marathi)

1 )Phonepe ॲप डाऊनलोड करा 
2) Register Now वर क्लिक करा 
3) Full Name, Mobile Number, Password भरा 
4) CONTINUE वर क्लिक करा

फोनपे चा वापर करून आपण कोणकोणत्या प्रकारच्या ऑनलाईन पेमेंट करू शकतो

ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन रिचार्ज करणे, पेमेंट करणे विजेचे बिल भरणे, गॅस सिलेंडर बुक करणे, मूव्ही तिकीट बुक करणे, ट्रेन तिकीट बुक करणे, फ्लाइट तिकीट बुक करणे, इन्शुरन्स करणे व मनी ट्रान्सफर करणे इत्यादी सुविधांचा उपयोग करू शकतात

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा