पेटीएम चे खाते कसे तयार करावे | How to Create Paytm Account In Marathi 2022

पेटीएम चे खाते कसे तयार करावे (How to Create Paytm Account In Marathi 2022,What is paytm,)

मित्रांनो इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे आजकाल ऑनलाईन पेमेंट ला जास्तीत जास्त महत्त्व दिले जात आहे. मार्केट मध्ये असे बरेच ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत, ज्यांचा उपयोग करून आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. जसे की फोन पे, गुगल पे, युपीआय ॲप, आय मोबाईल पे इत्यादी 

पण आजच्या या लेखामध्ये आपण ‘पेटीएम‘ या ऑनलाईन पेमेंट एप्लीकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. पेटीएम ही ई-कॉमर्स वेबसाईट आहे. ही वेबसाईट मुख्यतः मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी तयार करण्यात आली होती. 

How to Create Paytm Account In Marathi

पेटीएम या कंपनीद्वारे विनामूल्य पुरवल्या जाणाऱ्या अशा बऱ्याच सुविधा आहेत. या सुविधांचा उपयोग करून आपण आपली बरीच कामे घरी बसल्या बसल्या करू शकतो. जसे की ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन डीटीएच रिचार्ज करणे, ट्रेन तिकीट बुक करणे, फ्लाइट तिकीट बुक करणे, मनी ट्रान्सफर करणे, सिनेमाचे तिकीट बुक करणे, ऑनलाइन शॉपिंग करणे इत्यादी. पण या सुविधांचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी “पेटीएम चे एक खाते” तयार करावे लागेल. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेटीएम चे खाते कसे तयार करावे ? (how to Create Paytm Account In Marathi) तर मित्रांनो काळजी करायची काहीच गरज नाही! कारण आजच्या या माझ्या लेखांमध्ये मी तुम्हाला पेटीएम अकाउंट कसे तयार करावे, याबद्दल क्रमाक्रमाने माहिती दिलेली आहे. हा लेख पूर्ण वाचल्यानंतर तुम्ही तुमचे पेटीएम चे खाते तयार करू शकता. तर चला सुरुवात करू आजच्या या लेखाला

पेटीएम चे खाते कसे तयार करावे (How to Create Paytm Account In Marathi 2022)

पेटीएम खाते तयार करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रोसेस फॉलो करावी लागेल

स्टेप 1 : पेटीएम ॲप ला डाऊनलोड करा 

Paytm Install and download

सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम च्या ॲप्लिकेशन ला डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. जर तुमच्या मोबाईल मध्ये पेटीएम ॲप आधीपासून इंस्टॉल केलेली असेल, तर तुम्हाला ती इंस्टॉल करायची गरज नाही. आणि जर तुमच्या मोबाईल मध्ये पेटीएम एप्लीकेशन उपलब्ध नसेल तर, तुम्ही तिला प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता.

पेटीएम एप्लीकेशन डाउनलोड करण्यामध्ये तुमची मदत करण्यासाठी आम्ही पेटीएम एप्लीकेशन डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे त्यासाठी पेटीएम अप्लिकेशन डाऊनलोड यावर क्लिक करा.

स्टेप 2 : पेटीएम ॲप ला ओपन करा 

पेटीएम च्या ॲप्स ला डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेटीएम वर टॅब करून त्याला ओपन करा.

स्टेप 3 : लोगिन च्या ऑप्शन वर क्लिक करा 

पेटीएम ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर पेटीएम चा होमपेज येईल त्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला Login to paytm चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 : Create a New Account वर क्लिक करा 

Login to paytm वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल 

  • Login 
  • Create a New Account

जर तुमच्याजवळ आधीपासून पेटीएम चे खाते असेल, तर तुम्ही लॉगीन वर क्लिक करून त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि OTP प्रविष्ट करुन लॉग इन करू शकता. पण आपण येथे पेटीएम चे नवीन खाते तयार कसे करावे ?(How to Create Paytm Account In Marathi) हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही Create a New Account वर क्लिक करा.

स्टेप 5 : मोबाईल नंबर प्रविष्ट करा 

Create a new aacount वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायला सांगितले जाईल. तेथे तुम्ही तोच मोबाईल नंबर प्रविष्ट करा. जो तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक असेल. त्यानंतर “Proceed Securely” वर क्लिक करा.

स्टेप 6 : ओटीपी प्रविष्ट करा  

दुसऱ्या पेजवर तुम्हाला OTP प्रविष्ट करा असे विचारले जातील, व तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल तो तेथे भरून Done वर क्लिक करा.

स्टेप 7 : तुमच्या विषयी माहिती भरा 

नंतरच्या पेजवर तुम्हाला तुमच्या विषयी काही माहिती विचारली जाईल जसे की तुमचे नाव, आडनाव,  जन्म तारीख, लिंग इत्यादी विचारलेली सगळी माहिती तुम्ही अचूकपणे भरा व नंतर कन्फर्म वर क्लिक करा.

स्टेप 7 : पेटीएम वापरा 

आता तुमचे पेटीएम खाते तयार झालेले आहेत व तुम्ही ते वापरू शकता. यानंतर एक महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे पेटीएम मध्ये केवायसी करायचा व बँक अकाउंट ॲड करायचे ते आपण पुढील लेखांमध्ये माहिती करून घेऊ या 

निष्कष 

आजच्या लेखामध्ये आपण पेटीएम चे खाते कसे तयार करावे(How to Create paytm Account In marathi)  याबद्दल क्रमाक्रमाने माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर हा लेख पूर्ण वाचला असेल तर पेटीएम चे खाते कसे तयार करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. आणि अजूनही जर तुमच्या मनामध्ये पेटीएम विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही निसंकोचपणे खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट देऊ शकता.

FAQ

पेटीएम खाते तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक माहिती

तुमचे नाव मोबाईल नंबर आडनाव आणि ओटीपी 

पेटीएम ॲप फ्री आहे का

पेटीएम एप्लीकेशन चा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची फी द्यावी लागत नाही पेटीएम च्या सगळ्या सुविधा तुम्ही विनामूल्य वापरू शकता

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

3 thoughts on “पेटीएम चे खाते कसे तयार करावे | How to Create Paytm Account In Marathi 2022”

Leave a Comment