ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग माहिती | How to Book online Railway Ticket In Marathi

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग माहिती | How to Book online Railway Ticket In Marathi

आपल्या भारत देशांमधील बहुतांश लोक हे प्रवास करण्यासाठी बस आणि रेल्वे या दोन साधनाचा उपयोग करतात. त्यातही जर लांबचे प्रवास असेल तर रेल्वेचे प्रवास हेच योग्य मानले जातात कारण, रेल्वेचे नेटवर्क हे संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत व जवळपास अडीच करोड लोक हे दररोज प्रवास करण्यासाठी रेल्वे चा उपयोग करतात. 

पूर्वी रेल्वेचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर तिकीट काउंटर जवळ रांगेत उभे राहून रेल्वेचे तिकीट काढावे लागत असे . त्यात तुमचा बराच वेळ जात होता. मात्र आता रेल्वे खात्याने ऑनलाईन तिकीट बुकींग करण्याची सुविधा सुरू केलेले आहे. त्यामुळे आता रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची काहीच गरज नाही.

How to Book online Railway Ticket In Marathi

ऑनलाइन आता अशा बर्‍याच मोबाईल ॲप आणि वेबसाईट उपलब्ध आहे ज्यांचा उपयोग करुन तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करू शकता.

Table of Contents

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

ऑनलाइन अशा बऱ्याच मोबाईल ॲप व वेबसाइट उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग करुन तुम्ही रेल्वेचे तिकीट बुकिंग करू शकता पण त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक गोष्टी असणे गरजेचे आहे त्या खालील प्रमाणे.

 • तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे अत्यावश्‍यक आहे
 • ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय असणे आवश्यक आहे.
 • त्याबरोबरच आयआरसीटीसी मध्ये तुमचे खाते असणे गरजेचे आहेत.

आयआरसीटीसी मध्ये खाते तयार करण्याची प्रक्रिया

जर आतापर्यंत तुम्ही आयआरसीटीसी मध्ये तुमचे खाते तयार केलेले नसेल तर तुमच्यासाठी आयआरसीटीसी मध्ये खाते तयार करण्याची प्रक्रिया आम्ही खालीलप्रमाणे दिलेले आहे.

आयआरसीटीच्या ऑफिशिअल वेबसाईट चा उपयोग करून खाते तयार करण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्ही IRCTC च्या https://www.irctc.co.in/nget/train-search ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या नंतर त्या ठिकाणी रजिस्टर च्या बटन वर क्लिक करा 
 • आता तुमच्या समोर काही अशा प्रकारचा पेज उघडेल त्यामध्ये तुम्ही तुमचे बेसिक डिटेल्स, पर्सनल डिटेल्स आणि एड्रेस भरा व नंतर रजिस्टर वर क्लिक करा.
 • तिसरी पायरी- Continue वर क्लीक करताच तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कळवले जाईल की तुम्ही जे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिल्लीत ते व्हेरिफाय केले जाईल त्या ठिकाणी तुम्ही ओके वर क्लिक करा 
 • चौथी पायरी- आता तुमचा अकाउंट आयआरसीटीसी मध्ये सक्सेसफुली तयार झालेला आहे त्यानंतर तुम्हाला लॉगिन करून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करावी लागेल त्यासाठी लॉगिन वर क्लिक करा आणि तुम्ही तयार केलेले युजर आयडी आणि पासवर्ड इंटर करून आयआरसीटीसी मध्ये लॉग इन व्हा.
 • पाचवी पायरी- आयआरसीटीसी मध्ये लॉगिन झाल्यावर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्यासाठी सेंड ओटीपी वर क्लिक करून ओटीपी भरा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय होईल.

आता तुमचे खाते तयार झालेले आहेत तुम्ही निसंकोचपणे ऑनलाईन आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वेचे तिकीट बुक करू शकता

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करण्याची प्रक्रिया (How to Book online Railway Ticket In Marathi)

 • सर्वप्रथम आयसीटीच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या https://www.irctc.co.in/nget/train-search
 • आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्टेशनवरून कोणत्या ठिकाणी, जाणार आहात हे प्रविष्ट करा त्या बरोबरच किती तारखेला जाणार आहात ते ही प्रविष्ट करा.
 • आता तुम्ही प्रवास करण्यासाठी एक ग्रेड निवडा यासाठी तुमच्यासमोर तीन ऑप्शन येईल तात्काळ बुकिंग, सामान्य बुकिंग आणि महिलांसाठी या पैकी तुम्हाला जो हवा तो निवडा. 
 • नंतर तुम्ही जे शहर आणि तारीख निवडले आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या शोधण्यासाठी सर्च वर क्लिक करा. 
 • आता तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या तारखेला त्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांची सूची येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा वर्ग जसा की स्लीपर, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फर्स्ट क्लास निवडावा लागेल.
 • आता तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या डब्यामध्ये शीट उपलब्ध आहे किंवा नाही हे प्रदर्शित होईल 
 • शीट उपलब्ध असल्यास अवेलेबल असे लिहिलेले असेल त्याच्याखाली Book Now आणि त्याच्या समोर रक्कम दिलेली असेल. 
 • तिकीट बुक करण्यासाठी Book Now बटणावर क्लिक करा तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणावरील स्वस्त संबंधित निर्देशांचे पालन तुम्हाला करावे लागतील त्यासाठी I Agree वर क्लिक करा
 • आता या ठिकाणी तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाईट मध्ये लॉगिन व्हावे लागेल(तुम्ही जर आधीपासूनच लॉग-इन केलेले असेल तर तुम्हाला हि प्रक्रिया करण्याची गरज नाही) त्यासाठी युजरनेम, पासवर्ड, कॅपच्या प्रविष्ट करून लॉगिन वर क्लिक करा
 • आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला पॅसेंजरच्या डिटेल्स भरावे लागतील जसे की पॅसेंजर चे नाव, वय लिंग, प्रवास करण्यासाठी सीट कोणती हवी आहे ही सगळी माहिती अचूक पणे भरा
 • जर तुम्ही एका पेक्षा जास्त प्रवासी असाल तर त्याच्या विषयी माहिती भरावी लागेल 
 • यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्यावी लागेल त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तिथे देऊ शकता
 • कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी चाललात त्या ठिकाणाचा ऍड्रेस सुद्धा भरावा लागेल ही सगळी माहिती भरुन झाल्यानंतर
 • खाली तुम्हाला पेमेंट मोडचे दोन ऑप्शन दिले जातील भिमयुपीआय आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग 
 • यापैकी तुम्ही कोणत्याही पेमेंट मोडचा वापर करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमची टिकीट बुक होईल 
 • तिकीट बुक झाल्यानंतर तुम्ही तिला शेअर किंवा डाऊनलोड सुद्धा करू शकता

आयआरसीटीसीच्या मोबाईल ॲप द्वारे तिकीट बुक करणे (How to Book Online railway ticket from IRCTC Mobile Apps)

 • प्लेस्टोर वरून आयआरसीटीसीची मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
 • तुमचा आयआरसीटीसी चा युजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करून ॲप मध्ये लॉग इन व्हा 
 • आधी ट्रेन वर क्लिक करा व नंतर बुक तिकीट वर क्लिक करा
 • आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल माहिती भरा जसे की तुम्ही कोणत्या स्टेशन वरून, कोणत्या स्टेशन पर्यंत, किती तारखेला व तुमचा कोटा कोणता आहे जसे की तत्काळ, जनरल, लेडीज याच्या विषयी सगळी माहिती भरा व नंतर सर्च ट्रेन च्या बटन वर क्लिक करा 
 • आता तुमच्या समोर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या ट्रेनची सूची येईल 
 • यामधून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये जायचे आहे ती ट्रेन निवडा त्याच्याखाली तुम्हाला ट्रेन मधील सगळ्या Seates दाखवल्या जातील जसे की स्लीपर क्लास, थर्ड क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास 
 • यामध्ये काही सीट अवेलेबल असतील व काही नसतील त्यामुळे तुम्ही जे सीट अवेलेबल आहे ते शोधा व नंतर पॅसेंजर डिटेल्स भरुण पेमेंट पूर्ण करा 
 • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमची रेल्वेचे तिकीट बुक होईल त्या तिकीटला तुम्ही डाउनलोड किंवा शेअर सुद्धा करू शकता ती पूर्णपणे वैध मानली जाईल 

आज आपण काय शिकलो 

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करण्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. या लेखामध्ये आपण सगळ्यात आधी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आपले खाते तयार कशा प्रकारे करावे याबद्दल क्रमाक्रमाने माहिती घेतली व नंतर ऑनलाईन आयआरसीटीसी वेबसाईटचा उपयोग करून रेल्वेचे तिकीट बुकिंग कशी करावी याबद्दल सुद्धा क्रमाक्रमाने माहिती घेतली आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, हा लेख वाचून जर तुमची काही मदत झाली असेल तर तुम्ही या लेखाला तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व अशाच प्रकारची नवीन नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट द्या

तुम्हाला हे वाचायला आवडेल का

FAQ

ऑनलाइन रेल्वेची  तिकीट बुकिंग कशाप्रकारे करावी

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जा त्याठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करून ॲप्स मध्ये लॉग इन करा पॅसेंजर बद्दल माहिती भरा आणि पेमेंट करून तिकीट मिळवा

आयआरसीटीसी मध्ये खाते कसे तयार करावे

आयआरसीटीसी च्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या रजिस्टर वर क्लिक करा तुमच्या बद्दल ची सगळी माहिती भरा आणि खाली कंटिन्यू वर क्लिक करा 

मोबाईलचा वापर करून रेल्वेचे तात्काळ तिकीट बुकिंग कशी करावी 

आयआरसीटीसी ची एप्लीकेशन डाउनलोड करा नंतर लॉगिन करून प्रवासाबद्दल ची माहिती भरा पॅसेंजर ची माहिती भरा आणि पेमेंट पूर्ण करून तिकीट मिळवा

रेल्वेची तात्काळ तिकीट बुकिंग किती तासा आधी करावी

भारतीय रेल्वे नुसार रेल्वेची तात्काळ तिकीट बुकिंग ही एक दिवसांआधी करावी

तात्काळ मध्ये एका वेळेस किती टिकिट बुकिंग करू शकतो

तत्काळ मध्ये एका वेळेस तुम्ही चार पॅसेंजरच्या तिकीट बुकिंग करू शकता त्यासाठी आयआरसीटीसी ॲप्सचा उपयोग करा

Leave a Comment