ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करण्याच्या 4 पद्धती | How to Book Online Gas Cylinder in Marathi

ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करण्याच्या 4 पद्धती | How to Book Online Gas Cylinder in Marathi (book gas cylinder using paytm,google pay, phonepe, amazon pay in marathi)

इंटरनेटमुळे आजकाल सगळं काही ऑनलाइन झालेले आहे. आपण आपली बरीच कामे इंटरनेटचा वापर करून सहज करू शकतो. त्यातीलच एक महत्त्वाचे काम म्हणजे, ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करणे. आपल्या स्वयंपाक घरामधील गॅस सिलेंडर संपल्यानंतर ती परत रिफिल करावी लागते, त्यासाठी आधी गॅस सिलेंडर बुक करणे गरजेचे आहे. 

बऱ्याच लोकांना ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करण्याच्या पद्धती बद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना गॅस सिलेंडर बुक करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा लोकांच्या मदतीसाठी मी हा लेख लिहिलेला आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक कसे करावे ? (How to Book Online Gas Cylinder in Marathi) याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया आजच्या या लेखाला.

How to Book Online Gas Cylinder in Marathi

4 ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करण्याच्या पद्धती | How to Book Online Gas Cylinder in Marathi

या चार पद्धतीचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करू शकता या चारही पद्धती बद्दल मी तुम्हाला खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ती तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करताना लागणारे आवश्यक गोष्टी

 • LPG ID 
 • Mobile Number

Paytm द्वारे ऑनलाइन गॅस सिलेंडर बुक करणे

पेटीएम ॲप चा वापर करून तुम्ही ऑनलाईन गॅस सिलेंडर सहज बुक करू शकता त्यासाठी तुमच्याकडे पेटीएम चे खाते असणे गरजेचे आहे तुमचे पेटीएम चे खाते नसल्यास पेटीएम चे खाते कसे तयार करावे हे वाचा.

Paytm चा वापर करून गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया

 • पेटीएम ॲप ओपन करा.
 • खाली स्क्रोल करून रिचार्ज आणि बिल पेमेंट्स च्या विभागांमधील Book Gas Cylinder वर क्लिक करा.
 • तुमचा Gas Provider निवडा.
 • Bharatgas Provider निवडला असेल तर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID इंटर करून प्रोसीड वर क्लिक करा.
 • HP Gas Provider निवडला असेल तर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा 17 अंकी LPG ID इंटर केल्यानंतर गॅस एजन्सी निवडा. 
 • गॅस एजन्सी निवडण्यासाठी तुम्हाला तुमचा स्टेट, तुमची सिटी इंटर करावी लागेल त्यानंतर तुमच्या जवळील गॅस एजन्सी दाखविल्या जातील त्यामधून एक निवडा व नंतर प्रोसीड वर क्लिक करा.
 • Indane Gas Provider निवडला असेल तर बुकिंग व्हॅल्यू टाईप वर क्लिक करा मोबाईल नंबर किंवा LPG ID सेलेक्ट करून ते इंटर करा.
 • या ठिकाणी LPG ID चे फक्त लास्ट 16 अंक इंटर करावे लागतात.
 • LPG ID इंटर केल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर गॅस सिलेंडर बद्दल ची माहिती आणि किंमत येईल.
 • नंतर प्रोसीड टू बुक सिलेंडरवर क्लिक करा.
 • एक कूपन कोड आपलाय करा जेणेकरून तुम्हाला काही रुपयांचा कॅश बॅक मिळेल.
 • त्यानंतर प्रोसीड टू पे वर क्लिक करा आणि पेमेंट पूर्ण करा.
 • आता तुमच्या सिलेंडर बुक होईल. इनव्हाईस डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड इनव्हाईस वर क्लिक करा.

PhonePe द्वारे ऑनलाइन गॅस सिलेंडर बुक करणे

तुम्ही फोन पे चा वापर करून सुद्धा ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करू शकता त्यासाठी तुमच्याकडे फोन पेचे एक खाते असणे गरजेचे आहे त्याचे खाते नसल्यास फोन पे चे खाते कसे तयार करावे हे वाचा.

Phonepe चा वापर करून गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया

 • फोन पे ओपन करा.
 • रिचार्ज आणि बिल पेमेंट्स च्या विभागांमधील Book a Cylinder वर क्लिक करा. 
 • गॅस प्रोव्हायडर निवडा. 
 • गॅस बुकिंग मेथड(मोबाईल नंबर किंवा एलपीजी आय) निवडा व नंतर कन्फर्म वर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर सिलेंडर ची माहिती, किंमत व कस्टमर चे नाव येईल. 
 • त्यानंतर युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट पूर्ण करा.
 • तुमचा सिलेंडर बुक होईल.

Google Pay द्वारे ऑनलाइन गॅस सिलेंडर बुक करणे

गुगल पे चा वापर करून सुद्धा तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता त्यासाठी तुमच्याकडे गुगल पे चे खाते असायला हवे गुगल पे चे खाते नसल्यास गुगल पे चे खाते कसे तयार करावे हे वाचा.

Google Pay चा वापर करून गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया

 • गुगल प्ले ओपन करा.
 • न्यू पेमेंट वर क्लिक करा. 
 • त्यानंतर बिल पेमेंट वर क्लिक करा.
 • खालच्या बाजूला स्कूल करा आणि नंतर गॅस सिलेंडर बुकींग वर क्लिक करा.
 • या ठिकाणी तुमच्या गॅस ची कंपनी निवडा.
 • गुगल प्ले वरून जर तुम्ही पहिल्या वेळेस गॅस बुकिंग करत असाल तर तुम्हाला अकाउंट लिंक करावा लागतो.
 • गॅस अकाउंट लिंक करण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी एंटर करा.(एलपीजी आयडी चे फक्त लास्ट 16 अंक इंटर करा) 
 • नंतर लिंक अकाउंट वर क्लिक करा तुमची गॅस गुगल पे सोबत लिंक होईल.
 • नंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल व पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमची गॅस बुक होईल.
 • आता यानंतर जर तुम्हाला कधीही गुगल पे वरून गॅस बुक करायचे असेल तर फक्त पेमेंट करावे लागेल बाकीची माहिती भरण्याची गरज नाही कारण तुम्ही गुगल पे सोबत तुमच्या गॅस अकाउंट लिंक केलेले आहे.

Amazon Pay चा वापर करून गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया

 •  ॲमेझॉन एप्लीकेशन ओपन करा. 
 • खालच्या बाजूला स्क्रोल करा.
 • बिल पेमेंट मधील Gas Cylinder वर क्लिक करा.
 • गॅस ऑपरेटर सिलेक्ट करा.
 • रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयटी करा.
 • एलपीजी आयडी मधील स्टार्टिंग चे एक अंक डिलीट करा.
 • नंतर गेट बुकिंग डिटेल्स वर क्लिक करा. 
 • आता तुमच्यासमोर कस्टमर चे नाव सिलेंडरची किंमत येईल 
 • कंटिन्यू टू पे वर क्लिक करून पेमेंट पूर्ण करा. 
 • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा सिलेंडर बुक होईल.

आज आपण काय शिकलो

आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक कसे करावे ? (How to Book Online Gas Cylinder in Marathi) याबद्दलची माहिती घेतलेली आहे. आशा करतो की आता तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकाल, आणि अजूनही जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात आम्ही लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी परत इन मराठी आमोल पवार या वेबसाईटला भेट द्या.

आम्हाला फॉलो करा

1 thought on “ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करण्याच्या 4 पद्धती | How to Book Online Gas Cylinder in Marathi”

Leave a Comment