गुढीपाडवा मराठी माहिती | Gudi Padwa Information in Marathi | Gudi Padwa 2022

Gudi Padwa Information in Marathi आजच्या या लेखामध्ये आपण गुढीपाडव्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. गुढीपाडवा हा महाराष्ट्रामधील लोकांसाठी खूप महत्त्वाचं सन आहे आणि याच दिवसापासून महाराष्ट्रात नवीन वर्ष सुद्धा सुरू होतो. हिंदी दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्र मध्ये गुढीपाडवा हा सण अति उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो या दिवशी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली जाते स्वादिष्ट जेवण तयार केले जातात आणि सार्वजनिक ठिकाणी रांगोळी देखील काढली जाते व एकमेकांना शुभेच्छा देऊन गुढीपाडवा या सणाचे अति उत्साहाने आगमन केले जातात.

Gudi Padwa Information in Marathi

या सणा बद्दल आपल्याला सगळी माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण हा आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे म्हणूनच मी हा लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्या विषयी सगळी माहिती दिलेली आहे तर चला तुमचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया  

गुढीपाडवा इतिहास (History of Gudi Padwa In Marathi)

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कथा किंवा इतिहास दिलेला असतो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे सुद्धा काही इतिहास दिलेला आहे. काही जण असे म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवानी पूर्ण विश्वाची निर्मिती केली त्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करतो.

काही कथामध्ये असे सांगण्यात आले आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून लंकापति रावण आणि त्याच्या असुरांचा पराभव करून अयोध्येत परत आले होते. त्यामुळे आपण हा सण साजरा करतो. काही कथांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की याच दिवशी शिव आणि पार्वती माता या दोघांचे लग्न झालं ठरले होते त्यामुळे आपण हा सण साजरा करतो 

काही पौराणिक कथांमध्ये असेही मानण्यात आले आहेत. महाभारताच्या आदिपर्वात इंद्रदेवाने कुरुवंशीय राजा उपचरित ला एक कळकाची काठी दिली आणि ती काठी उपचरित राजाने जमिनीत रोवली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याची पूजा केली याच परंपरेचा आदर राखण्यासाठी दुसऱ्या प्रांतातील राजेही तेव्हापासून काठीला शेलासारखे वस्त्र लावून त्या काठीची पूजा करू लागले तेव्हापासून ही प्रथा अस्तित्वात आली.

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Information in Marathi)

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा दिलेल्या असल्या तरीही महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते त्यामुळे आजही गुढीपाडवा हा सण तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो 

कोणतेही सण असो ते साजरा करण्याची पद्धत आपल्याला आपल्या पूर्वजांकडून शिकायला मिळालेली आहे. पण आपले पूर्वज कोणतेही सण असेच साजरा करत नव्हते नेहमी त्यामागे त्यांचे काही ना काही उद्दिष्ट असायचे तसेच गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे सुद्धा त्यांचे काही उद्दिष्ट होते जी पुढे येणाऱ्या पिढीला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे कारण तेव्हाच येणाऱ्या पिढीला गुढीपाडवा या सणाचे महत्त्व कळेल व तेही हा सण उत्साहाने साजरा करू लागेल 

गुढीपाडवा नेहमी वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. कारण त्या वेळेस वातावरणामध्ये बदल झालेले असतात. जवळपास सगळ्या झाडावरील जुने व सुकलेली पानं गळून त्या झाडांना परत हिरवी पाने फुटायला सुरुवात होते आणि याच काळात आंब्याला मोहोर सुद्धा येतो त्यामुळेच गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते

पूर्वीच्या काळातील माणसे चैत्र शुद्ध प्रतिपदेला कडुलिंबाच्या पानाबरोबर ओवा मीठ मिरची हिंग,आणि साखर वाटून खात होते. त्या काळातील लोकांचे असे म्हणणे होते की यामुळे पचनक्रिया मध्ये सुधारणा करून पित्तनाश करणे शक्य होते त्याबरोबरच त्वचारोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे व असे अनेक औषधी गुणधर्म कडुलिंबाच्या अंगी आहेत. असे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहेत.

कडूलिंबाची पाने वाटून खाणे आणि ते आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून आंघोळी करणे हे आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी खूप हीत्तकारक समजले जातात. गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे असणारे अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व आहे त्यामुळेच आपल्या पुढील पिढीला गुढीपाडव्याचे महत्व माहिती असणे खूप गरजेचे आहे 

गुढीपाडवा कधी साजरा केला जातो

दरवर्षी गुढीपाडवा हा सण हिंदी दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरुवातीला साजरा केला जातो मागील वर्षी म्हणजे 2021 मध्ये हा सन 13 एप्रिलला रोजी साजरा करण्यात आला होता व या वर्षी 2 एप्रिल 2022 ला गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे

गुढीपाडवा का साजरा केला जातो

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा दिलेल्या आहेत आणि त्या कथेचा आदर किंवा त्या परंपरा जपण्यासाठी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो असे म्हणतात की या दिवशी ब्रह्मदेवाने पूर्ण विश्वास निर्माण केले आहे 

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो

गुढीपाडवा हा महाराष्ट्रामधील लोकांसाठी अति उत्साहाचा सण आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी माणसे लवकर उठून स्नान करताना आणि सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात व दुपारी गुढीला नैवेद्य दाखवून संध्याकाळी परत गुढीची पूजा करून तिला खाली उतरविले जातात.

गुढीपाडव्याच्या दिवशी सगळी जण एकमेकांना शुभेच्छा देतात, व नवीन वर्षाचे आगमन करण्यासाठी वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा केले जातात. या सणाच्या दिवशी महिला वेगळ्या प्रकारच्या साड्या घालतात विशेषतः नऊवारी साडी. त्यासोबतच त्यादिवशी मराठी बायका काही दागिने सुद्धा घालून दिसतात.

गुढीपाडवा हा सण जेवढ्या आनंदामध्ये बायका साजरा करताना अगदी ती तितक्याच आनंदात पुरुष मंडळी सुद्धा हा सण साजरा करताना दिसतात. नवीन वर्षाचा आगमन करण्यासाठी पुरुष मंडळी वेगवेगळी वेशभूषा करतात त्यामध्ये पुरुष मंडळी धोती, सलवार, कुर्ता असे पारंपारिक पेहराव करून गावभर शोभायात्रा काढताना आपल्याला दिसतात.

तसेच या दिवशी सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात त्याबरोबरच सगळी माणसे एकत्र जमतात आणि लेझीम, ढोल ताशे घेऊन मोठी शोभायात्रा काढतात या यात्रेमध्ये शहरामधील सर्व समाजातील माणसे सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचा आनंदाने आणि उत्साहाने आगमन करतात

गुढी उभारण्याचा मुहूर्त आणि पद्धत

गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे व ती कशाप्रकारे उभारावे याबद्दल नव्या पिढीला जरा कमी माहिती असलेली दिसून आलेले आहे दरवर्षी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते त्यासाठी घरातील सगळी माणसे लवकर उठून स्नान करतात व नंतर गुढी उभारतात

साधारणपणे महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला गुढी उभारण्याचा मुहूर्त हा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर चा आहे. त्यामुळेच महाराष्ट्र मधील सगळी माणसे सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्योदय झाल्यानंतर त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या उंचावर गुढी उभारतात.

एका बांबूच्या उंच काठीला कडुलिंबाची डहाळी त्या काठीच्या वरच्या बाजूला एक रेशीम कापड, साखरेची गाढी व फुलाचा हार बांधून नंतर त्यावर तांब्याचे भांडे बसवले जाते अशाप्रकारे गुडी तयार करतात

त्यानंतर त्या गुढीला दारात उंच गच्चीवर लावतात त्याची पूजा करता वेळेस त्याला गंध, फुले अक्षता वाहतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी हळद कुंकू लावून गुढीला परत खाली उतरविले जातात.

गुढीपाडवा विशेष पकवान

गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष पकवान तयार केले जातात त्या सगळ्यांचा गुढीला नैवेद्य दाखवला जातो महाराष्ट्रातील विशेष पकवान म्हणजे श्रीखंड, पुरणपोळी, गाजरचा हलवा, डाळींबी उसळ, पुरी भाजी, खीर, बासुंदी पुरी इत्यादीं अशी वेगवेगळी पकवान गुढीपाडव्याच्या दिवशी बनवले जातात.

गुढीपाडवा शुभेच्छा

1

  1. “निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच उंच गुढी. 

नवे नवे वर्ष आले, घेऊनी गुडी सारखी गोडी “

गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

2

  1. श्रीखंड पुरी, रेशमी गुढी आणि कडुलिंबाचा पान.

  तुमचे आणि तुमच्या परिवाराचे नवीन वर्ष जावे 

  एकदम छान. 

गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

निष्कर्ष

Gudi Padwa Information in Marathi या लेखामध्ये आपण गुढीपाडव्या विषयी सविस्तर माहिती घेतलेले आहेत या लेखामध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या लेखाला शेअर करू शकता आणि असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट देऊ शकता. शेवटी एवढेच तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

FAQ

गुढीपाडवा कधी साजरा केला जातो

दरवर्षी गुढीपाडवा हा सण हिंदी दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरुवातीला साजरा केला जातो

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

Leave a Comment