Google pay म्हणजे काय ? Google Pay चे खाते कसे तयार करावे ? | Google Pay in Marathi |

Google Pay म्हणजे काय ? Google Pay in Marathi (Google Pay Information History, Account Opening Process, Bank Account Adding process, Google Pay Services, Money transfer process, Earn Money form Google Pay, In Marathi)

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Google Pay म्हणजे काय ? (Google Pay in Marathi) Google Pay चे खाते कसे तयार करावे ? Google Pay चे वापर करून पैसे कसे कमवावे ? या सगळ्या विषयाबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करू या 

मित्रांनो आजकाल सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारल्या जात आहे त्यामुळे भारतीय नागरिकांकडून डिजिटल पेमेंट करणे याला जास्त महत्त्व दिले जात आहे. आज जर तुम्ही कोणत्याही दुकानावर वस्तू खरेदी करण्यासाठी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला Google Pay, Phonepe, Paytm, UPI याठिकाणी स्वीकारले जातील असे लिहिलेले दिसतात याचा अर्थ असा होतो की त्या दुकानावर तुम्ही या सगळ्या पेमेंट ॲप्सचा वापर करून त्यांना पैसे पाठवून त्या दुकानातील वस्तू खरेदी करू शकता. 

डिजिटल पेमेंट चा वापर करण्यासाठी ऑनलाईन असे बरेच अँप्लिकेशन उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. जसे की Google Pay, Phonepe, Paytm, UPI पण या सगळ्या अप्लिकेशन चा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला यामध्ये तुमचे खाते तयार करून त्यामध्ये तुमचा बँक अकाउंट ॲड करावा लागेल 

आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले असेल की या सगळ्या ॲप्स मध्ये आपण आपले खाते कसे काय तयार करावे ? व त्यामध्ये बँक अकाउंट कसे ॲड करावे तर काळजी करू नका कारण आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला वर दिलेल्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन पैकी एका अप्लिकेशन बद्दल म्हणजेच Google Pay बद्दल सगळी माहिती देणार आहे जसे की गुगल पे काय आहे ? (Google Pay in Marathi) गुगल चे खाते कसे तयार करावे ? आणि गुगल पे चा वापर करून तुम्ही पैसे कसे कमाऊ शकता. तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या या लेखाला.

Google Pay in Marathi

गुगल पे म्हणजे काय (Google Pay in Marathi)

गुगल पे हा एक गुगल कंपनी द्वारे तयार करण्यात आलेला डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन डिजिटल पेमेंट सिस्टम आहे. ज्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर गुगल पे आपल्याला विनामूल्य अशा बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देतो ज्याचा उपयोग आपण घरी बसल्या आणि आपल्या मोबाईल फोनवरून करू शकतो. 

जसे की मोबाईल रिचार्ज करणे, डीटीएच रिचार्ज करने, मनी ट्रान्सफर करणे,ऑनलाइन शॉपिंग केल्यावर त्या ठिकाणी बिल पेमेंट करणे, गॅस सिलेंडर बुक करणे, क्रेडिट कार्डचे बिल भरणे, विजेचे बिल भरणे इत्यादी l

गुगल पे चा इतिहास (History Of Google Pay Marathi)

सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच 2011 मध्ये गुगल कंपनीद्वारे अँड्रॉइड पे आणि गुगल वॉलेट अशा दोन सर्विस सुरू करण्यात आल्या व काही काळानंतर म्हणजेच 2018 मध्ये या दोन्ही सर्विसना एकत्र करून एक नवीन सर्विस तयार करण्यात आली त्याचे नाव गुगल पे ठेवण्यात आले

भारतामध्ये गुगल कंपनीने 18 सप्टेंबर 2017 मध्ये एक पेमेंट ॲप लॉन्च केले व त्याचे नाव सुरुवातीला तेज असे ठेवण्यात आले. तेज हे यूपीआय वर आधारित डिजिटल पेमेंट ॲप्लीकेशन होते म्हणजेच यूपी याच्या मदतीने तेज ॲप्सचे यूजर्स कोणत्याही मर्चंटला पेमेंट करू शकत होते. 28 ऑगस्ट 2018 मध्ये गुगल कंपनीने तेज ॲप चे नाव बदलून त्याचे नाव गुगल पे असे ठेवले.

गुगल पे चे खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

 • कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड
 • एक जीमेल आयडी 
 • मोबाईल नंबर (मोबाईल नंबर जो तुमच्या बँकेमध्ये लिंक असेल व त्यामध्ये एसएमएस पाठवण्यात इतके बॅलन्स असेल आणि त्यावेळेस तुमच्या मोबाईल मध्ये उपलब्ध असेल)

गुगल पे मध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया(Google Pay Account Opening Process In marathi)

गुगल पे मध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेली आहे.

 • Play Store वरून Google Pay ची ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
 • नंतर Google Pay इंस्टॉल करून ओपन करा.
 • आता बँकेमध्ये लिंक असलेले मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि नंतर Next वर क्लिक करा. 
 • या ठिकाणी तुमची जी मेल आयडी प्रविष्ट करा आणि नंतर Next वर क्लिक करा.
 • आता तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला एक एसेमेस पाठवले जाईल व त्यामध्ये एक ओटीपी दिलेला असेल
 • तो तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करावे लागेल (जर तुम्ही ओटीपी ऑटोफिलला अलाव केलेले असेल तर ओटीपी ऑटोमॅटिकली फिल होतो) 
 • आता तुमचा Google Pay Secure करण्यासाठी एक गूगल पिन सेट करावा लागेल त्यामध्ये तुम्ही तुमचा स्क्रीन लॉक किंवा एखादे गुगल पिन सुद्धा ठेवू शकता. 
 • नंतर कंटिन्यूवर क्लिक करा 
 • आता तुमचा गुगल पे अकाउंट तयार झालेला आहे यानंतर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट गुगल पे सोबत जोडावा लागेल त्यासाठी खाली प्रक्रिया दिलेली आहे.

गुगल पे मध्ये बँक अकाऊंट जोडण्याची प्रक्रिया (Process of Adding Bank Account In google Pay Marathi)

 • उजव्या हात्ताच्या बाजूला तुम्हाला एक प्रोफाईल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा
 • त्यानंतर add bank Account वर क्लिक करा
 • याठिकाणी तुमच्यासमोर सगळ्या बँकेची लिस्ट येईल त्यामधून तुमची बँक निवडा (ज्या बँकेत तुमचे खाते आहेत व तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे)
 • जर या ठिकाणी तुम्हाला काही परमिशन मागितल्या गेल्या तर तुम्ही त्यांना Allow करा
 • आत्ता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि तो तुमच्या बँकेत सोबत व्हेरिफाय करायला सांगितले जातील
 • मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी Send SMS वर क्लिक करा.
 • बँके सोबत मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर Continue वर क्लिक करा.
 • आता या ठिकाणी तुमच्या एटीएम कार्ड चे लास्ट 6 Digits प्रविष्ट कार 
 • त्यानंतर तुमच्या एटीएम कार्डची एक्सपायरी डेट प्रविष्ट करून Next वर क्लिक करा 
 • नंतर Create UPI  PIN वर क्लिक करा 
 • आता बँकेतर्फे तुम्हाला एक OTP पाठवला जाईल तो प्रविष्ट करून तुमच्या गुगल पे साठी एक 6 अंकी UPI PIN सेट करा ( UPI PIN ठेवताना तो तुमच्या लक्षात राहिल असा ठेवा कारण प्रत्येक वेळेस कुठेही पेमेंट करताना तुम्हाला हा UPI PIN प्रविष्ट करावा लागेल) 
 • UPI PIN प्रविष्ट केल्यानंतर Done वर क्लिक करा व UPI PIN CONFIRM करण्यासाठी परत UPI PIN प्रविष्ट करा.
 • आता Done वर क्लिक केल्यानंतर तुमचा बँक अकाउंट गुगल पे सोबत जोडला जाईल.

आता तुम्ही गुगल पे वापरण्यासाठी सुरुवात करू शकता कारण तुमचा गुगल पे अकाउंट पूर्णपणे तयार झालेला आहे. 

गुगल पे द्वारा पुरवल्या जाणाऱ्या सेवा (Serviceses by google Pay in Marathi)

 • मोबाईल रिचार्ज करणे
 • डीटीएच किंवा केबल टीव्ही रिचार्ज करणे 
 • गूगल प्ले स्टोर ला रिचार्ज करणे 
 • फास्टट्रॅक रिचार्ज करणे 
 • विजेचे बिल भरणे 
 • ब्रास बँड किंवा लैंडलाइन बिल भरणे
 • एज्युकेशन फी भरणे 
 • घरगुती गॅस सिलेंडर बुक करणे 
 • लोण इएमआय भरणे 
 • ओटीटी प्लॅटफॉर्मची सबस्क्रीप्शन फी भरणे
 • हॉस्पिटलचे बिल भरणे
 • मनी ट्रान्सफर करणे.

गुगल पे द्वारे पैसे कसे पाठवावे (Money transfer Process Google Pay In Marathi)

गुगल पे ॲप चा उपयोग करून तुम्ही पाच पद्धतीने पैसे पाठवू शकत.

 1. QR Code द्वारे 
 2. Mobile No. द्वारे
 3. Bank transfer 
 4. UPI ID द्वारे
 5. Self Transfer 

QR Code द्वारे

गुगल पे चा वापर करून QR Code च्या मदतीने पैसे पाठवणे अगदी सोपे आणि जलद आहे. कारण यामध्ये फक्त तुम्हाला एक QR Code स्कॅन करावा लागतो नंतर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता. आता जवळपास सगळीकडेच QR Code उपलब्ध झालेले आहेत जसे की जनरल स्टोअर, किराणा,पार्लर,शोरूम,शॉपिंग मॉल्स, डी मार्ट इत्यादी.

Mobile No. द्वारे

 गुगल पे चा वापर करून पैसे पाठवण्यासाठी Mobile No हा सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा गुगल पे नंबर प्रविष्ट करावे लागेल. नंतर तुम्ही त्या व्यक्तीला सहज पैसे पाठवू शकता.

Bank Transfer

Bank transfer हा सुद्धा गुगल पे च्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे यामध्ये तुमच्याकडे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीच्या बॅंकेचे डिटेल्स असणे गरजेचे आहे यामध्ये

 • Bank account Number
 • IFSC Code
 • Bank Holder Name

जर एखाद्या व्यक्तीचे गुगल पे चे खाते नसेल आणि तुमच्याकडे त्या व्यक्तीच्या बँकेची माहिती असेल तर अशा वेळेस तुम्ही Bank transfer या पर्यायाचा उपयोग करू शकता.

Self Transfer

जर तुमच्या गुगल पे ला एकापेक्षा अधिक बँक खाते लिंक असेल आणि तुम्हाला तुमच्या एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर अशा वेळेस तुम्ही Self Transfer या पर्यायाचा उपयोग करू शकता.

गुगल पे चा वापर करून पैसे कसे कमवावे (How to Earn Money From Google Pay In Marathi)

आजकाल सगळ्याच कंपन्यांमध्ये Refer And Earn प्रोग्राम चालविले जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना एका लिंक द्वारे एप्लीकेशन Refer करावी लागते. जर तुमच्या नातेवाईकांनी तुम्ही पाठविलेल्या लिंक द्वारे त्या ॲप्लिकेशन मध्ये खाते तयार केले तर त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला काही पैसे दिले जातात.

असाच एक प्रोग्राम गुगल पे मध्ये सुद्धा दिलेला आहे ज्यामध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट मधील मित्र किंवा नातेवाईकांना Invite करण्यासाठी सांगितले जातात आणि जर त्या लोकांनी तुमच्या लिंकद्वारे गुगल पे मध्ये त्यांचे खाते तयार केले तर तुम्हाला कॅशबॅक म्हणून काही पैसे दिले जातात त्याबरोबर त्या लोकांनाही कॅशबॅक म्हणून काही रिवॉर्ड दिले जातात.

गुगल पे रेफर अंड अर्ण प्रोग्राम प्रोसेस (Google Pay Refer And Earn Program Process in marathi)

 • गुगल पे ची आपलिकेशन ओपन करा 
 • स्क्रोल करा आणि Promotions मधील Referrals वर क्लिक करा 
 • आता तुमच्या समोर तुमच्या कॉन्टॅक्ट मधील ज्या ज्या व्यक्तींना तुम्ही Invite करू शकता त्या व्यक्तीचे नाव आणि नंबर येईल आणि त्यांच्या समोर Invite म्हणून एक ऑप्शन दिलेला असेल 
 • Invite वर क्लिक केल्यानंतर एक लिंक जनरेट होईल ती तुम्ही तुमच्या मित्राला व्हाट्सअप, मेसेज यापैकी कोणत्याही पद्धतीने पाठवू शकता.
 • नंतर तुमच्या मित्राला त्या लिंक वर क्लिक करुन गूगल पे चे खाते तयार करायला सांगा
 • गुगल पै खाते पूर्णपणे तयार झाल्यानंतर कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला पहिली पेमेंट करायला सांगा 
 • पहिली पेमेंट एक रुपयाची सुद्धा असू शकते.

21 रुपये कॅशबॅक मिळवा (Get INR 21 Just Use Our Link) 

तुम्ही जर गुगल पे चे नवीन खाते तयार करत असाल तर आमच्या लिंकचा उपयोग करून 21 रुपये मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणी गुगल पे डाऊनलोड करा नंतर त्यामध्ये तुमचे खाते तयार करा व पहिली पेमेंट करताना Note box मध्ये आमचा कोड Enter करा. कोड आणि लिंग तुम्हाला खाली दिलेले आहे.

Google Pay Account LinkClick Here
My Code f0gd8t

आज आपण काय शिकलो ?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण Google Pay म्हणजे काय ? ( Google Pay In Marathi) Google Pay चे खाते कसे तयार करावे ?  गुगल पे चा वापर करून पैसे कसे कमवावे ? या सगळ्या विषया बद्दल सविस्तर माहिती करून घेतलेली आहे. आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व माहिती आवडल्यास आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईट परत भेट द्या.

2 thoughts on “Google pay म्हणजे काय ? Google Pay चे खाते कसे तयार करावे ? | Google Pay in Marathi |”

Leave a Comment