लवकरच AR ‘लाइव्ह व्ह्यू’ फीचर गुगल मॅपमध्ये येणार, जाणून घ्या काय आहे ते आणि कसे काम करेल

गुगल मॅप अतिशय उपयुक्त ॲप्लिकेशन आहे त्यामुळे भारतातील सगळेजण या ॲप्लिकेशनचा उपयोग करतात व शिवाय हा गुगल कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेला अप्लिकेशन असल्यामुळे आधीपासूनच मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून दिलेला असतो त्यामुळे आपल्याला ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही. न्यूजला या ॲप्लिकेशनचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा त्यामुळे गुगल कंपनी सातत्याने या अप्लिकेशन मध्ये अपडेट आणून या एप्लीकेशन ला यूजर फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करत असते. 

Image Source – Google

नवीन अपडेटमध्ये काय उपलब्ध असेल

Google ने जाहीर केले आहे की ते निवडक शहरांमध्ये त्याच्या Google Maps ॲप्समध्ये नवीन ऑगमेंटेड रियलिटी (AR) ‘लाइव्ह व्ह्यू’ फीचर्स चालू करत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे गुगल हा फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर वापर करण्यासाठी एकाच वेळेस घेऊन येतोय.

एक मोठी वेबसाईट जागरण नुसार पुढील आठवड्यापासून लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, पॅरिस, सॅन फ्रान्सिस्को आणि टोकियोमध्ये हे नवीन फीचर सुरू होईल.

गुगल ने लॉन्च केलेल्या या नवीन फीचर्स चा ज्या वेळेस यूजर वापर करेल त्या वेळेस त्याला त्याच्या जवळील एटीएम, कॉफी शॉप व दुकाने हे देखील लाईव्ह त्याच्या मोबाईल वर पाहता येतील यासाठी युजरला त्याच्या गुगल ॲप मधील सर्च बार मधील कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून त्याच्या मोबाईलचा कॅमेरा जवळपासच्या बिल्डिंग वर पॉईंट करावा लागेल त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिन वर एक पॉप-अप येईल त्यामध्ये काही डॉट दिलेले असेल तेच डॉट तुम्हाला लोकेशन प्रोव्हाइड करतील 

गुगलने सप्टेंबरमध्ये लाइव्ह व्ह्यूसह सर्चची माहितीही दिली होती. याव्यतिरिक्त, वापरकर्ते ‘फास्ट चार्ज’ फिल्टर सेट करू शकतात, जे त्यांना 50 किलोवॅट चार्जर किंवा त्याहून अधिक असलेले स्टेशन शोधण्यात मदत करेल.

Leave a Comment