एअरप्लेन मोड काय आहे | Airplane Mode Information in Marathi


Airplane Mode information in Marathi: तुम्ही जर मोबाईल चा उपयोग करत असाल तर मोबाईलच्या शॉर्टकट सेंटर मध्ये Airplane mode चा ऑप्शन नक्कीच पाहिलेला असेल. व जर तुमच्यापैकी कोणी कधी विमानाने प्रवास केला असेल तर त्यांनी नक्कीच Airplane Mode चा उपयोग ही केलेला असेल.

व काही जण असे पण असतील ज्यांना Airplane mode बद्दल अजूनही खूप कमी माहिती आहे. किंवा काहीच माहिती नाही व तुम्ही जर त्यापैकी एक असाल आणि तुम्हाला एयरप्लेन मोड बद्दल अजून जास्त माहिती जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी माझा हा लेख खूप उपयोगी ठरणार आहे. कारण या लेखांमध्ये मी तुम्हाला Airplane Mode information in marathi या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Airplane Mode in Marathi

तसे तर एयरप्लेन मोड ला फ्लाइट मोड सुद्धा म्हटले जाते. हा एक खूप महत्त्वाचा फीचर्स मोबाईल मध्ये दिलेला आहे पण त्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण त्याचा उपयोग योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी करू शकत नाही.

तुम्हाला एयरप्लेन मोड बद्दल संपूर्ण माहिती व्हावी व तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेला त्याचा उपयोग करणे शिकावे यासाठीच मी Airplane mode information In marathi हा लेख लिहिलेला आहे. तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करी या लेखाला.

एयरप्लेन मोड म्हणजे काय (Airplane Mode in Marathi)

एअरप्लेन मोड हा लॅपटॉप, टॅबलेट व मोबाईल मध्ये उपस्थित असलेला एक खास फिचर्स आहे. ज्याचा सगळ्यात जास्त उपयोग मोबाईल मध्ये होतो. एअरप्लेन मोड तुमच्या मोबाईल मधील सगळ्या वायरलेस सुविधांना एकाच वेळेस बंद करू शकतो. जसे की मोबाईल डेटा, फोन कॉल्स, वाय-फाय,  ब्लूटूथ, नेटवर्क इत्यादी. एरोप्लेन मोड चालू करण्यासाठी मोबाईलचे शॉर्टकट सेंटर मध्ये जावे व नंतर एअरप्लेन मोड च्या आयकॉन वर क्लिक करावे. तसेच एअरप्लेन मोड बंद करण्यासाठी परत त्या आयकॉन वर क्लिक करावे.

सोप्या भाषेत सांगायचे असेल तर, एरोप्लेन मोड एक अशी सेटिंग आहे जी चालू केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वरून कोणाला फोन करू शकत नाही किंवा कोणाचा फोन सुद्धा घेऊ शकत नाही तसेच तुम्ही इंटरनेटचा उपयोग हि करू शकत नाही

फ्लाईट मोडला एयरप्लेन मोड का म्हणतात ?

फ्लाईट मोडलाज एयरप्लेन मोड म्हणतात कारण जेव्हा तुम्ही फ्लाईटने प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला व तुमच्या मोबाईल फोन ला सुरक्षित ठेवण्यासाठी या फीचर्सचा उपयोग केला जातो व या फिचर्समुळे तुमच्या मोबाईल मधील ट्रान्समिशन सिग्नल मुळे विमानामध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणी सुद्धा टाळल्या जातात म्हणूनच याला फ्लाईट मोड किंवा एयरप्लेन म्हणतात

विमानामध्ये एयरप्लेन मोडचा वापर का करावा ?

तुम्ही कधी ना कधी हे प्रश्न तर नक्कीच ऐकले असाल. जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला आपला मोबाईल फोन बंद करावा लागतो किंवा एरोप्लेन मोड चालू करावे लागते पण असे का करावे लागते हे तुम्हाला माहिती आहे का 

या प्रश्नाचं एकच उत्तर आहे. आपला मोबाईल नेटवर्क, आपण जेव्हा कधी दुसऱ्या एरिया मध्ये जातो त्यावेळेस आपला मोबाईल फोन आपल्याला चांगला नेटवर्क मिळावा व काही अडचणी नसताना फोन कॉल करता यावा किंवा इंटरनेटचा वापर करता यावा त्यासाठी सतत जवळच्या मोबाईल टावर सोबत कम्युनिकेशन करत असतो. 

जेव्हा आपण विमानाने प्रवास करत असतो त्या वेळेस उंच आकाशामध्ये मोबाईल नेटवर्क मिळणे थोडे कठीण असते. त्यामुळे आपला मोबाईल फोन सिग्नल बूस्ट करतो व त्याच्या जवळील मोबाईल टावर सोबत कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. या प्रोसेस मध्ये ट्रान्समिशन सिग्नल चा उपयोग केला जातो व याच ट्रान्सलेशन सिग्नल मुळे विमानामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात व अशा परिस्थितीमध्ये विमानाच्या पायलटला विमानावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते याच कारणामुळे विमानामध्ये एयरप्लेन मोडचा उपयोग केला जातो

काय होणार जर आपण विमानामध्ये एरोप्लेन मोड चालू केले नाही तर 

एखाद्यावेळेस जर तुम्ही विमानामध्ये तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफ केले नाही किंवा एअरप्लेन मोड चालू केला नाही तर घाबरून जाऊ नका व असे विचार करू नका की आता तुमचा विमान कोसळून पडेल. कारण आता टेक्नॉलॉजी खूप आडवांस झालेले आहे त्यामुळे विमानामध्ये तांत्रिक अडचणी येणे जवळजवळ शक्यच नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही विमानामध्ये मोबाईल फोनचा उपयोग करावा. त्यामुळे विमानाने प्रवास करतांना नेहमी तुम्ही तुमचा मोबाईल फोन बंद करावा किंवा मोबाईल मधील एअरप्लेन मोड चालू करा. जेणेकरून तुमच्या मोबाईलच्या सिग्नल ट्रान्समिशन मुळे होणारा धोका टळेल. 

एयरप्लेन मोडचे फायदे ? (Airplane Mode Benefits)

एअरप्लेन मोड चालू करण्याचे फायदे खालीलप्रमाणे दिलेले आहे

 • जर तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क कनेक्शन चे प्रॉब्लेम येत असेल तर मोबाईल फोन रिसेट करण्या ऐवजी तुम्ही एयरप्लेन मोडचा उपयोग करू शकता त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क प्रॉब्लेम सॉल होऊ शकते.
 • जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फास्ट चार्जिंग करायचे असेल. तर अशा वेळेस तुम्ही एयरप्लेन मोडचा उपयोग करू शकता, कारण एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर तुमच्या मोबाईल मधील सगळ्या वायरलेस सुविधा बंद होतात व बॅकग्राऊंड मध्ये कोणत्या प्रकारचे बॅटरी युज होत नाही त्यामुळे तुमचा मोबाईल फोन फास्ट चार्जिंग होतो 
 • एरोप्लेन मोड चालू केल्यानंतरही तुम्ही वाय-फाय च्या मदतीने इंटरनेटचा उपयोग करू शकता वाय फाय च्या मदतीने तुम्ही विमानामध्ये प्रवास करताना सुद्धा इंटरनेट चालवण्याचा आनंद घेऊ शकता. 
 • जर तुम्ही एखाद्या वेळेस कामांमध्ये व्यस्त असाल व त्यावेळेस तुम्ही मोबाईल फोन मुळे होणारे डिस्टर्बन्स पासून वाचण्यासाठी या एरोप्लेन मोड चा उपयोग करू शकता. 
 • मोबाईल फोनची बॅटरी कमी खर्च होण्यासाठी सुद्धा किंवा सेव्ह करण्यासाठी सुद्धा एरोप्लेन मोडचा उपयोग करू शकता तुम्ही जर एखाद्या अर्जंट मीटिंग मध्ये असाल व त्यावेळी तुम्हाला कोणाचाही फोन कॉल किंवा मेसेज द्यायचे नसेल तर तुम्ही एअरप्लेन मोडचा उपयोग करू शकता 
 • तुम्ही जर एखाद्या अर्जंट मीटिंग मध्ये असाल व त्यावेळी तुम्हाला कोणाचाही फोन कॉल किंवा मेसेज चे उत्तर द्यायचे नसेल तर तुम्ही एअरप्लेन मोडचा  उपयोग करू शकता. 

एयरप्लेन मोडचे नुकसान (Airplane Mode Disadvantage)

एयरप्लेन मोड मुळे होणारे सगळे नुकसान खालीलप्रमाणे दिलेले आहेत

 • एअरटेल मोड चालू केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोन मधील सगळ्या वायरलेस सुविधा बंद होतात. 
 • एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर तुम्ही कोणालाही कॉल करू शकत नाही किंवा कोणाचा फोन कॉल रिसीव करू शकत नाही. 
 • एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये इंटरनेटचा उपयोग करू शकत नाही. मात्र वायफाय चा उपयोग करू शकता 
 • एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर तुम्हाला ब्लूटुथ चालू करता येत नाही त्यामुळे ब्ल्यूटूथ च्या सगळ्या सेवांचा उपयोग सुद्धा तुम्ही करू शकत नाही. 
 • जर तुम्ही एरोप्लेन मोड चालू करत असाल तर त्या वेळेमध्ये आलेले फोन कॉल्स तुम्हाला समजणार नाही

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण Airplane Mode information In Marathi या विषया बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर अजूनही तुमच्या मनामध्ये एरोप्लेन मोड बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व जर तुम्हाला हा लेख उपयोगी पडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्राबरोबर सुद्धा शेअर करू शकता. व असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या इन मराठी या वेबसाईटला सबस्क्राईब सुद्धा करू शकता.

आम्हाला फॉलो करा 

FAQ

एयरप्लेन मोड म्हणजे काय ?

एअरप्लेन मोड हा लॅपटॉप, टॅबलेट व मोबाईल मध्ये उपस्थित असलेला एक खास फिचर्स आहे ज्याचा सगळ्यात जास्त उपयोग मोबाईल मध्ये होतो. एअरप्लेन मोड तुमच्या मोबाईल मधील सगळ्या वायरलेस सुविधांना एकाच वेळेस बंद करू शकतो जसे की मोबाईल डेटा, फोन कॉल्स, वाय-फाय,  ब्लूटूथ

विमानामध्ये एयरप्लेन मोडचा वापर का करावा ?

या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आपला मोबाईल नेटवर्क आपण जेव्हा कधी दुसऱ्या एरिया मध्ये जातो त्यावेळेस आपला मोबाईल फोन आपल्याला चांगला नेटवर्क मिळावा व काही अडचणी नसताना फोन कॉल करता यावा किंवा इंटरनेटचा वापर करता यावा त्यासाठी सतत जवळच्या मोबाईल टावर सोबत कम्युनिकेशन करत असतो

एयरप्लेन मोडचे फायदे ?

1) जर तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क कनेक्शन चे प्रॉब्लेम येत असेल तर मोबाईल फोन रिसेट करण्या ऐवजी तुम्ही एयरप्लेन मोडचा उपयोग करू शकता त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क प्रॉब्लेम सॉल होऊ शकते 
2) जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फास्ट चार्जिंग करायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही एयरप्लेन मोडचा उपयोग करू शकता कारण एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर तुमच्या मोबाईल मधील सगळ्या वायरलेस सुविधा बंद होतात व बॅकग्राऊंड मध्ये कोणत्या प्रकारचे बॅटरी युज होत नाही त्यामुळे तुमचा मोबाईल फोन फास्ट चार्जिंग होतो 
3) एरोप्लेन मोड चालू केल्यानंतरही तुम्ही वाय-फाय च्या मदतीने इंटरनेटचा उपयोग करू शकता वाय फाय च्या मदतीने तुम्ही विमानामध्ये प्रवास करताना सुद्धा इंटरनेट चालवण्याचा आनंद घेऊ शकता

2 thoughts on “एअरप्लेन मोड काय आहे | Airplane Mode Information in Marathi”

Leave a Comment