7/12 Utara in Marathi Online : या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सातबारा विषयी आपल्या मराठी भाषेत सविस्तर माहिती देणार आहोत. महाराष्ट्र शासनाने अनेक सेवा आणि सुविधांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहेत त्यामध्ये 7/12 सुद्धा येतो .आधीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना सातबारा विषयी माहिती करून घेण्यासाठी तहसील ला भेट द्यावे लागत असे. पण मात्र आता महाराष्ट्र शासनाने ही प्रक्रिया खूप सोपी केलेली आहे. सातबारा उतारा ऑनलाइन काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाभुलेख नावाचा पोर्टल किंवा वेबसाइट सुरू केलेली आहे जिचा उपयोग करून सर्वसामान्य माणूस घरी बसल्या त्याच्या मोबाईल फोनवरून किंवा कम्प्युटर वरून आपला सातबारा ऑनलाइन बघू शकतो व त्याला पीडीएफच्या स्वरूपात डाऊनलोड सुद्धा करू शकतो.


बऱ्याच लोकांना सातबारा उतारा काढण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे ते 7/12 विषयी माहिती मिळविण्यासाठी अजूनही सेवा केंद्राला भेट देतात. पण हा लेख पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कधीही 7/12 काढण्यासाठी किंवा सातबारा विषयी माहिती मिळवण्यासाठी सेवा केंद्राला भेट द्यावे लागणार नाही. कारण या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला 7/12 उतारा काढण्याची प्रक्रिया (7/12 Utara in marathi online) क्रमाक्रमाने सांगितली आहे. त्यामुळे हा लेख तुम्ही पूर्ण नक्की वाचा. तर चला तुमचे वेळ वाया नघालवता सुरुवात करूया आजच्या या लेखाला पण त्याआधी आपण सातबारा म्हणजे काय याच्या विषयी थोडी माहिती करून घेऊया.
7/12 उतारा म्हणजे काय ? (What Is 7/12 Utara in Marathi Online)
सातबारा उतारा म्हणजे एक लेखी माहिती आहे ज्यामध्ये लिखित स्वरूपात जमिनी विषयी संपूर्ण माहिती दिलेली असते जी आपण प्रत्यक्ष जमिनीला भेट न देता घरी बसल्या सातबारा च्या मदतीने मिळवू शकतो. गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 हे दोघेही एकत्र मिळून सातबारा तयार झालेला आहे सातबारा उतारा मध्ये प्रत्येक जमीनदाराकडे जमिन किती आणि कोणती आहे या बद्दल माहिती दिलेली असते.
7/12 उतारा चे वैशिष्ट्य
सातबाराचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दिलेले आहेत
- सातबारा उतारा मध्ये तुमच्या जमिनी विषयी सगळी माहिती दिलेली असते जसे की सध्या ती जमीन कोणाच्या नावावर आहे किती एकर आहे इत्यादी.
- तसेच यामध्ये जमिनीच्या मालकांनी जमिनीवर महाराष्ट्र शासनाकडून घेतलेल्या कर्जाची नोंद केली जाते
- म्हणजेच खत, किटकनाशके, अनुदाने इत्यादी साठी घेतलेले कर्ज
- 7/12 उतारा हा कागदपत्र म्हणून शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. कारण त्यामध्ये ती जमीन कोणाच्या मालकीची आहे हे लिहिलेले असते.
- आता जवळपास सगळ्याच लोकांचा सातबारा डिजिटल उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती घरी बसल्या 7/12 विषयी माहिती मिळवु शकतो
ऑनलाईन 7/12 उतारा काढण्याची प्रक्रिया (7/12 Utara in Marathi Online Process)
ऑनलाईन 7/12 उतारा काढण्याची प्रक्रिया सविस्तर पणे खालील प्रमाणे दिलेली आहे.
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटला भेट देण्यासाठी तुम्ही मोबाइल फोन किंवा कम्प्युटर या दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाचा उपयोग करू शकता.
- त्यानंतर तुमच्यासमोर महाभुलेख वेबसाईटचे होमपेज येईल त्यावर तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल.


जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहिती नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या तक्त्याची मदत घेऊ शकता
विभाग | जिल्हे |
---|---|
अमरावती विभाग | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ,वाशिम |
औरंगाबाद विभाग | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
पुणे विभाग | पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर |
कोकण विभाग | ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई सिटी, मुंबई सुबुरबन |
नाशिक विभाग | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
नागपूर विभाग | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया |
एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पुणे विभाग निवडलेला आहे
- तुमचे विभाग निवडून झाल्यावर त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या Go च्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही निवडलेल्या विभागाचा होमपेज तुमच्यासमोर येईल


- त्यावर तुम्हाला तीन पर्याय दिलेले असेल ते म्हणजे
- 7/12
- 8अ
- मालमत्ता पत्रक
- या पैकी तुम्हाला ज्याच्या विषयी माहिती मिळवायची आहे तो पर्याय निवडा.


- त्याच्याच खाली तुम्हाला जिल्हा निवडा चा पर्यायही दिलेला असेल त्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा निवडा
- त्यानंतर तुम्हाला तुमचे तालुका निवडण्यासाठी विचारले जातील त्यामध्ये तुम्ही तुमचा तालुका निवडा
- तालुक्याच्या नंतर तुम्हाला तुमचा गाव निवडावे लागेल
- गाव निवडल्यानंतर तुम्हाला खाली काही पर्याय दिले जातील जसे की
- सर्वे नंबर
- पहिले नाव
- मधील नाव
- आडनाव
- संपूर्ण नाव
- गट नंबर इत्यादी
- यापैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक इनपुट बॉक्स दिसेल.
- त्या इनपुट बॉक्समध्ये माहिती भरून शोधाच्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचा 7/12 तुमच्यासमोर येईल
उदाहरणार्थ तुम्ही जर पहिले नाव हा पर्याय निवडला असेल तर इनपुट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे पहिले नाव द्यावे लागेल व नंतर शोधा या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा 7/12 येईल
या सातबाराला तुम्ही पीडीएफ स्वरुपात डाऊनलोडही करु शकता त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड चा पर्यायही दिलेला असेल
आज आपण काय शिकलो
7/12 Utara in Marathi Online 2022 त्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला 7/12 काय असतो व 7/12 काढण्याची प्रक्रिया 7/12 चे वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल, व आतापर्यंत तुम्ही तुमचा 7/12 काढणे शिकले असाल या लेखामुळे जर तुम्हाला काही मदत झाली असेल तर या लेखाला फेसबुक वर शेअर करा आणि असेच नवीन नवीन विषया विषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईट ला परत भेट द्या
FAQ
सातबारा उतारा ऑनलाइन कसा शोधावा ?
महाराष्ट्र शासनाच्या महाभुलेख या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर तुमचा विभाग निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा,हे सगळे निवड झाल्यानंतर खाली तुम्हाला काही पर्याय दिले जातील त्यापैकी कोणतेही पर्याय निवडा व त्याविषयी माहिती भरून शोधाच्या पर्यायावर क्लिक करा तुमच्या समोर 7/12 येईल
7/12 उतारा म्हणजे काय ?
सातबारा उतारा म्हणजे एक लेखी माहिती आहे ज्यामध्ये लिखित स्वरूपात जमिनी विषयी संपूर्ण माहिती दिलेली
7/12 ऑनलाइन काढता येतो का
हो. आणि तुम्ही त्याला पीडीएफ डाऊनलोड करू शकता
3 thoughts on “7/12 उतारा मराठी माहिती | 7/12 Utara in Marathi Online 2022 |ऑनलाइन 7/12 काढण्याची प्रक्रिया”