मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती | 5 Ways of Mobile Recharge In Marathi

मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती 5 Ways of Mobile Recharge In Marathi(Paytm,Phonepe,google pay,myjio apps, airtel thanks apps)

मित्रांनो आजकालच्या डिजिटल युगात इंटरनेटचे रिचार्ज करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे झाले आहे कारण आपली अशी बरीच कामे आहेत जे इंटरनेट च्या माध्यमातून पार पाडली जातात. इंटरनेट शिवाय जगणे आपण इमॅजीन सुद्धा करू शकत नाही. कारण साधा एखांदा युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी, ऑनलाईन न्यूज वाचण्यासाठी, सोशल मीडिया साईड वापरण्यासाठी व इतर कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज पडते.

5 Ways of Mobile Recharge In Marathi

आज सगळं काही ऑनलाईन झालेले आहे त्यामुळे इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा एक भागच बनलेला आहे. आधी जर मोबाईल रिचार्ज (इंटरनेट आणि कॉलिंग) करायचे असेल तर आपण मोबाईल फोन रिचार्ज करणाऱ्या दुकान वर जाऊन रिचार्ज करत होतो पण मात्र आता सगळं काही ऑनलाईन झाल्यामुळे आपण आपला मोबाईल फोन घरी बसून रिचार्ज करू शकतो मोबाईल फोन रिचार्ज करण्याचे अशा बर्‍याच पद्धती आहेत पण आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती (5 Ways of Mobile Recharge In Marathi) समजावून सांगणार आहे या पद्धतींचा उपयोग करून तुम्ही घरी बसल्या तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करू शकता.

मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती | 5 Ways of Mobile Recharge In Marathi

1) PayTM App

पेटीएम ही एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. जी मोबाईल रिचार्ज करणे आणि डीटीएच रिचार्ज करणे या उद्देशाने सुरू करण्यात आली होती पेटीएम चा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल फोन घरी बसल्या आणि काही सेकंदांमध्ये रिचार्ज करू शकता त्यासाठी फक्त तुमच्याकडे पेटीएमचे एक खाते असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही हे पेटीएम चे खाते कसे तयार करावे वाचू शकता.

पेटीएम चा वापर करून मोबाईल फोन रिचार्ज करणे (Step by Step)

 • पेटीएम ॲप ओपन करा. 
 • खाली स्क्रोल करा व रिचार्ज आणि बिल पेमेंटच्या विभागा मधील मोबाईल रिचार्ज वर क्लिक करा 
 • त्यानंतर मोबाईल नंबर इंटर करा. 
 • आता तुमच्यासमोर रिचार्ज प्लान दाखवले जातील 
 • त्यामधील जो रिचार्ज प्लॅन तुम्हाला निवडायचा आहे तो निवडा आणि नंतर पेटीएमने पेमेंट पूर्ण करा.
 • पेमेंट पूर्ण केल्यावर तुमचा मोबाईल फोन रिचार्ज होईल.

2) Phonepe

फोन पे हा सुद्धा एक डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टम आहे ज्याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या मोबाईल फोन घरी बसल्या रिचार्ज करू शकता पण यासाठी सुद्धा तुमच्याकडे फोनचे खाते असणे गरजेचे आहे त्यासाठी फोन पे चे खाते कसे तयार करावे हे वाचा

फोन पे चा वापर करून मोबाईल रिचार्ज करणे (Step by Step)

 • फोन पे एप्लीकेशन ओपन करा.
 • रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागा मधील मोबाईल रिचार्ज वर क्लिक करा.
 • मोबाईल नंबर इंटर करा.
 • ऑपरेटर आणि सर्कल सिलेक्ट करा. 
 • त्यानंतर खाली तुम्हाला रिचार्ज प्लान दाखवले जातील
 • त्यामधून तुम्हाला जो हवा आहे तो रिचार्ज प्लॅन सिलेक्ट करा.
 • व नंतर फोन पे ने पेमेंट पूर्ण करा.
 • पेमेंट पूर्ण होताच तुमचा मोबाईल फोन रिचार्ज होईल

3) Google Pay

गुगल पे हा एक गुगल कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला एक डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टम आहे ज्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी करू शकता त्याचबरोबर गुगल पे हा मोबाईल रिचार्ज करणे ही सर्व सुद्धा प्रोव्हाइड करतो गुगलचा उपयोग करून सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करू शकता त्यासाठी तुमच्याकडे गूगलचे खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे गुगल पे चे खाते नसल्यास, गूगलचे खाते गुगल चे खाते कसे तयार करावे हे वाचा.

गुगल पे चा वापर करून मोबाईल रिचार्ज करणे ( Step By Step)

 • गुगल पे ची एप्लीकेशन ओपन करा.
 • न्यू पेमेंट वर क्लिक करा.
 • त्यानंतर रिचार्ज आणि बिल पेमेंट्स विभागांमधील मोबाईल चार्ज वर क्लिक करा.
 • मोबाईल नंबर इंटर करा.
 • ऑपरेटर सिलेक्ट करा.
 • अनंत कंटिन्यू वर क्लिक करा.
 • आता तुम्हाला सगळे रिचार्ज प्लॅन दाखविले जातील
 • तुम्हाला जो हवा आहे तो रिचार्ज प्लॅन निवडा 
 • व  नंतर गुगल पे नी पेमेंट करा.
 • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा मोबाईल रिचार्ज होईल.

4) MyJio App

तुम्ही जर जिओचे कस्टमर असाल तर माय जिओ ॲप चा वापर करून सुद्धा तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करू शकता. माय जिओ ही जिओ कंपनीचे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुमच्या जिओ सिम बद्दल ची सगळी माहिती दिलेले असते. जसे की तुमचा सध्याचा रिचार्ज प्लॅन कोणता आहे. किती दिवसांनी तो संपणार आहे,आज तुम्ही किती MB वापरलेली आहे इत्यादी माय जिओ ॲप चा वापर करून रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये लॉगिन करावे लागेल.

Myjio App मध्ये लॉगिन करण्याची प्रक्रिया

 • गूगल प्ले स्टोर वरून माय जिओ ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. 
 • माय जिओ आपला ओपन करा. 
 • तुमच्या 10 अंकी जिओ मोबाईल नंबर एंटर करा.
 • त्यावर एक कोटी पाठवला जाईल तो एंटर करा.
 • व नेक्स्ट व क्लिक करा.

माय जिओ ॲप चा वापर करून मोबाईल रिचार्ज करणे

 • माय जिओ ॲप ओपन करा.
 • रिचार्ज वर क्लिक करा.
 • जिओ चे सगळे प्लॅन्स दाखविले जातील.
 • त्यातून तुम्हाला जो हवा तो रिचार्ज प्लॅन निवडा
 • त्या समोरील buy वर क्लिक करा.
 • त्यानंतर युपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटच्या मदतीने पेमेंट करा
 • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा मोबाईल रिचार्ज होईल.

5) Airtel Thanks

आजकाल मार्केट मध्ये फक्त दोनच सिम कार्ड जास्तीत जास्त वापरले जात आहे ते म्हणजे jio आणि Airtel तुम्ही जर एअरटेल युजर असाल तर एअरटेल थँक्स ॲप चा वापर करून तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करू शकतो एअरटेल थँक्स ही एअरटेल कंपनीची ऑफिशियल एप्लीकेशन आहे जमते तुम्हाला तुमच्या एअरटेल सीम ची सगळी माहिती दिलेली असते एअरटेल थँक्स ॲपचा वापर करून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला एअरटेल थँक्स ॲप्स मध्ये लॉग इन करावे लागेल.

Airtel Thanks मध्ये लॉगिन करण्याची प्रक्रिया

 • प्ले स्टोर वरून एअरटेल थँक्स एप्लीकेशन डाउनलोड करा.
 • आता तिला ओपन करा.
 • 10 अंकी एअरटेल मोबाईल नंबर इंटर करा.
 • सेंड ओटीपी वर क्लिक करा
 • ओटीपी इंटर करून एअरटेल थँक्स मध्ये लॉगिन करा.

एअरटेल थँक्स ॲप्स चा वापर करून मोबाईल रिचार्ज करणे

 • एअरटेल थँक्स ॲप ओपन करा.
 • रिचार्ज वर क्लिक करा.
 • नंतर प्रीपेड वर क्लिक करा.
 • मोबाईल नंबर एंटर करा 
 • खाली दाखवलेल्या रिचार्ज प्लॅन मधील प्लॅन निवडा आणि त्यावर क्लिक करा.
 • आता युपीआय, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट पूर्ण करा.
 • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा मोबाईल फोन रिचार्ज होईल.

आज आपण काय शिकलो

आजच्या लेखामध्ये आपण मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती (5 Ways of Mobile Recharge In Marathi) बद्दल सविस्तरपणे माहिती घेतलेले आहेत या पाच पद्धतीचा उपयोग करुन तुम्ही तुमचा मोबाईल फोन घरी बसल्या रिचार्ज करू शकता.

Follo Us

telegram

1 thought on “मोबाईल रिचार्ज करण्याच्या 5 पद्धती | 5 Ways of Mobile Recharge In Marathi”

Leave a Comment